शरद पवार रविवारी साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यात शरद पवारांनी ०००७ क्रमांकाच्या गाडीतून सातारा ते कराड असा प्रवास केला. शासकीय विश्रामगृहावर साताऱ्यातील इच्छुकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या सर्वांमध्ये चर्चा मात्र गाडीतून आलेल्या पवारांच्या गाडीच्या क्रमांकाची रंगली. समाज माध्यमावर तर पवारांचा उदयनराजे यांच्या गाडीतून प्रवास अशी जोरदार चर्चा जिल्हाभर होऊ लागली. साताऱ्यात ००७ क्रमांकाचे मोठे आकर्षण आहे आणि खासदार उदयनराजेंच्या सर्व गाड्यांचे क्रमांक असेच आहेत. हा क्रमांक पहिला की सातारकरांना उदयनराजेंची आठवण येते. यावेळी शरद पवारांनी उदयनराजेंची यांच्या वाहनाच्या क्रमांकाशी साधर्म्य असलेल्या वाहनातून कार्यक्रम स्थळी व विश्रामगृहावर प्रवेश करताच सातारकरांच्या भुवया उंचावल्या. उदयनराजे गाडीतून शरद पवार कसे आले, याचीच खुमासदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तर ही शरद पवारांचीच गुगली होती का, अशीही कुजबुज सुरू झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा