Santosh Danve vs Rajabhau Deshmukh vs Surekha Lahane in Bhokardan Assembly Constituency : सलग पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी होणारे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर भोकरदन विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेले त्यांचे पुत्र संतोष यांच्यासाठी नवे आव्हान उभे राहिले आहे. या मतदारसंघातून लोकसभेत काँग्रेसच्या कल्याण काळे यांना ८६२ मतांची निसटती आघाडी मिळाल्याने मविआच्या नेते, कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले असून याचा फायदा मविआच्या उमेदवारास होण्याची शक्यता आहे.
लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यापूर्वी १९९० आणि १९९५ मध्ये भाजपकडून रावसाहेब दानवे यांनी भोकरदान विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांचे चिरंजीव संतोष दानवे या मतदार संघातून भाजपकडून निवडून आले आहेत. मात्र, रावसाहेबांचा लोकसभेत पराभव झाल्यामुळे या मतदारसंघातील भाजपचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा >>>काँग्रेस नेत्यांवर ईडीची कारवाई; हिमाचल प्रदेशमधील बनावट आयुष्मान कार्डाचे प्रकरण तापले, ईडीच्या रडारवर कोणकोण?
१९९९ मध्ये भोकरदनमधून भाजपचे विठ्ठलराव सपकाळ निवडून आहे होते. परंतु त्यांच्या निधनामुळे या जागेवर २००३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले चंद्रकांत दानवे निवडून आले. त्यानंतर २००४ आणि २००९ मध्येही चंद्रकांत दानवे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले. या तिन्हीही निवडणुकीत त्यांचे मताधिक्य मात्र घटत गेले. २००३ मध्ये १६ हजार ६७६ तर २००४ मध्ये त्यांचे मताधिक्य ३ हजार ११९ होते. २००९ मध्ये चंद्रकांत दानवे यांनी रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मलात्ताई यांच्या विरोधात निवडणूक जिंकली. परंतु त्यावेळी त्यांचे मताधिक्य १ हजार ६३९ एवढे होते. २०१४ आणि २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत दानवे यांचा पराभव झाला. या दोन्ही वेळेस रावसाहेब यांचे चिरंजीव संतोष यांनी त्यांचा पराभव केला. २०१४ मध्ये चंद्रकांत दानवे यांचा ६ हजार ७५० मतांनी, २०१९ मध्ये ३२ हजार ४९० मतांनी पराभव झाला होता. मात्र, यंदा लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी आघाडी घेतल्याने मविआच्या नेत्यांमध्ये पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला असून तो संतोष दानवे यांच्यासाठी आव्हान ठरू शकतो.
हेही वाचा >>>पैठण मतदासंघातून खासदार संदीपान भुमरे यांच्या चिरंजीवास उतरविण्याची तयारी
मविआत चढाओढ
महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी मात्र स्पर्धा सुरू झाली आहे. काही इच्छुक उमेदवार यावेळेस चंद्रकांत दानवे यांना उमेदवारी का देऊ नये असे सांगत त्यांच्या मागील पाच निवडणुकांतील मतांची गोळाबेरीज मांडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने यांनी भर मेळाव्यात उमेदवारीवर दावा केला. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख हेही या जागेसाठी आग्रही आहेत. आघाडीत परंपरेनुसार जिल्यातील जालना आणि परतूर हे दोन विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडे आहेत. हा मुद्दा काँग्रेसकडून पुढे करण्यात येत आहे.