Devendra Fadnavis in Assembly Election 2024: नागपूर : लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशाचे विश्लेषण करून विधानसभेत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र, २००९ पासून दक्षिण-पश्चिम नागपूरमधून सातत्याने विजयी होणाऱ्या फडणवीस यांची त्यांच्या घरच्या मतदारसंघातच कसोटी लागणार आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीपासूनच्या निवडणुकांत दक्षिण-पश्चिम नागपूरमधून सातत्याने घटणारे मताधिक्य हे फडणवीस यांच्यापुढील एक आव्हान असणार आहे.

भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मागील दहा वर्षांतील निवडणुकांतील भाजपला मिळालेल्या मतांमध्ये सातत्याने घट होत आहे. त्यामुळे २०२४ मध्ये काँग्रेसने प्रबळ उमेदवार दिल्यास फडणवीस यांना आपल्या मतदारसंघातच संघर्ष करावा लागू शकतो, असे चित्र सध्या तरी या मतदारसंघात आहे.

Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार

हेही वाचा >>>“उत्तर बंगालमधील जिल्हे मिळून स्वतंत्र राज्य करा”; भाजपा नेत्यांच्या मागणीमागे काय आहे राजकारण?

देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय आलेख कायम चढता राहिला आहे. ते १९९२ ला नागपूरचे महापौर होते. ते प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले आणि महापौर झाले. त्यानंतर १९९९ मध्ये ते प्रथम आमदार झाले. त्यांनी त्याकाळचे दिग्गज काँग्रेस नेते अशोक धवड यांचा ९ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. २००४ मध्ये त्यांनी याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख यांचा त्यांनी १७ हजार १६० मतांनी पराभव केला होता. १९९९ च्या तुलनेत २००४ मध्ये फडणवीस यांच्या मताधिक्यात जवळपास दुपटीने वाढ झाली होती. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन दक्षिण-पश्चिम हा नवीन मतदारसंघ तयार झाला. २००९ ची निवडणूक फडणवीस नवनिर्मित दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून लढले. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा २७ हजार मतांनी पराभव केला होता. २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांचा ५८ हजारांनी पराभव करून मतदारसंघावरील पकड अधिक घट्ट केली होती. १९९९ ते २०१४ या दरम्यान त्यांच्या मताधिक्यात सातत्याने वाढ होत राहिली. मात्र, २०१९च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीपासून हा आलेख उलटा झाल्याचे दिसत आहे.

हेही वाचा >>>“केजरीवालांची तब्येत बिघडावी म्हणून कट”; आप-काँग्रेस एकत्र येऊन करणार आंदोलन

फडणवीस हे राज्यात मुख्यमंत्री असताना झालेल्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नागपूरमधील उमेदवार नितीन गडकरी यांना दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातून ६५ हजारांचे मताधिक्य मिळाले. मात्र, त्यानंतर सहाच महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून फडणवीस यांचे मताधिक्य कमी झाले. फडणवीस यांना एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प भाजपने केला होता. प्रत्यक्षात त्यांना ५० हजारांचे मताधिक्यही गाठता आले नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजप उमेदवार नितीन गडकरी यांना फडणवीस यांच्या मतदारसंघातून २०१९ च्या तुलनेत निम्मेच मताधिक्य मिळाले. भाजपच्या स्थानिक नेतृत्वासाठी ही चिंतेची बाब असून मताधिक्य कसे वाढवता येईल, यासाठी व्यूहरचना आखली जात आहे.

मताधिक्याचा उतरता आलेख

२०१४ विधानसभा निवडणूक : दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस ५८ हजारांहून अधिक मतांनी विजयी.

२०१९ लोकसभा निवडणूक : नितीन गडकरी यांना दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून ६५ हजारांचे मताधिक्य.

२०१९ विधानसभा निवडणूक : दक्षिण-पश्चिम नागपूरमधून फडणवीस यांचा ४९ हजार मतांनी विजय.

२०२४ लोकसभा निवडणूक : नितीन गडकरी यांना दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून ३३ हजारांचे मताधिक्य.

Story img Loader