Malabar Hill Constituency South Mumbai Assembly Elections 2024 ठाकूरद्वार, गिरगाव, ऑपेरा हाऊस, ग्रॅन्ट रोड, ताडदेव आणि आसपासचा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जात होता. मात्र शिवसेनेने मलबार हिल मतदारसंघ भाजपसाठी सोडला आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला. भाजपने रा. स्व. संघातील स्वयंसेवकांच्या मदतीने या परिसरात चांगलेच बस्तान मांडले असून विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला दांडगा जनसंपर्क आणि जनमानसात चांगली प्रतिमा असलेल्या उमेदवाराचा शोध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत दक्षिण मुंबईमधील ठाकूरद्वार, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, ताडदेव आणि आसपासच्या परिसराचा समावेश असलेला ऑपेरा हाऊस मतदारसंघ काही वर्षांपूर्वी मलबार हिल मतदारसंघात विलीन झाला. दक्षिण मुंबईमधील या मतदारसंघातील ठाकूरद्वार, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, ताडदेव आणि आसपासच्या परिसरात शिवसेनेचे प्राबल्य होते. विधानसभेच्या १९९०, १९९५ आणि १९९९ मधील निवडणुकीत ऑपेरा हाऊस मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रकांत पडवळ विजयी झाले होते. त्यानंतर २००४ मधील निवडणुकीत याच मतदारसंघात विजयी होऊन अरविंद नेरकर विधानसभेत गेले. दरम्यानच्या काळात मतदारसंघांच्या पुनर्रचनेत ऑपेरा हाऊस मतदारसंघ मलबार हिल मतदारसंघात विलीन झाला. त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत ‘मातोश्री’ने शिवसेनेतील स्थानिक नेत्यांचा विरोध झुगारून मलबार हिल मतदारसंघ भाजपसाठी सोडला आणि भाजपने या मतदारसंघात आपले चांगलेच बस्तान मांडले. विधानसभेच्या २००९, २०१४ व २०१९ मधील निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भाजपचे मंगलप्रभात लोढा प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. इतकेच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजप-रा. स्व. संघाने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत शिवसेनेचा बालेकिल्ला काबीज केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीतील दक्षिण मुंबईत झालेला पराभव ‘मातोश्री’ला जिव्हारी लागला होता.
हेही वाचा >>>RSS शी संबंधित ‘पांचजन्य’मधून जातीव्यवस्थेचं समर्थन; थेट अग्रलेखातून मांडली सविस्तर भूमिका!
लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार यामिनी जाधव यांच्या पारड्यात मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी भरभरून मते टाकली. यामिनी जाधव यांना या विधानसभा मतदारसंघातून ८७ हजार ८६७ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत यांना ३९ हजार ५७३ मते मिळाली. मतांची ही आकडेवारी लक्षात घेता काही वर्षांपूर्वी मलबार हिल मतदारसंघ भाजपसाठी सोडल्याचा पश्चाताप आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होऊ लागला आहे. मलबार हिल मतदारसंघातील मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागात विजय मिळविणे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अवघड बनल्याची चिन्हे आहेत.
मराठी टक्क्यांची घसरण
गल्या काही दशकांमध्ये या भागातील घसरलेला मराठी टक्का, अमराठी मतदारांची वाढलेली संख्या आणि मुख्य म्हणजे काही वर्षांपूर्वी गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रांवरून उभयतांमध्ये विकोपाला गेलेल्या वादामुळे आक्रमक झालेल्या भाजपने रा. स्व. संघातील स्वयंसेवकांच्या मदतीने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडले. प्रमोद नवलकर, चंद्रकांत पडवळ, विलास अवचट आदी मंडळींनंतर शिवसेनेकडे म्हणावे तसे नेते या भागात नाहीत. कोणे एकेकाळी या भागातील छोटे-मोठे वाद शिवसेनेच्या शाखांमध्ये सोडविले जात होते. अनेक बेरोजगार तरुणांना शाखांच्या माध्यमातून बड्या कंपन्या, बँका, संस्थांमध्ये नोकऱ्या मिळत होत्या. परंतु आता तसे काहीच होताना दिसत नाही.