Pune Hadapsar Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला असताना पुणे जिल्ह्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळविण्यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांत, तर महायुतीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चुरस असणार आहे. हडपसरची ही लढाई त्यामुळे रंगतदार होणार आहे.

महाविकास आघाडीमध्ये पुणे शहरातील विधानसभेच्या जागावाटपाचे प्राथमिक सूत्र निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसला प्रत्येकी तीन तर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दोन मतदारसंघ देण्याचे ठरवण्यात आले आहे. हडपसरमध्ये शिवसेनेचे महादेव बाबर हे माजी आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेत हडपसर मतदारसंघावर दावा केला होता. मात्र या मतदारसंघातून पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप इच्छुक आहेत.

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
cm devendra fadnavis gharkul scheme
Devendra Fadnavis : सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

तमिळनाडूमध्ये महिनाभरात ५ राजकीय कार्यकर्त्यांची हत्या; काय आहे कारण?

गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर तुपे हे अजित पवार यांच्या गोटात दाखल झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटातील प्रशांत जगताप यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रशांत जगताप या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार असतील, असे संकेत दिले आहेत.

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यामान आमदार चेतन तुपे यांचा या मतदारसंघावर दावा आहे, तर मित्रपक्ष शिवसेनेचाही या मतदारसंघावर डोळा आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसाठी हडपसर विधानसभा मतदारसंघ कळीचा ठरणार आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर भानगिरे यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. गेल्या वेळीही निवडणूक लढविण्यासाठी ते आग्रही होते. भानगिरे यांनी त्यादृष्टीने मोर्चेंबांधणीही केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असल्याने शिवसेनेकडूनही भानगिरे यांच्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाची मागणी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>अरविंद केजरीवलांनंतर ‘आप’च्या आणखी एका नेत्याला होणार अटक? कोण आहेत दुर्गेश पाठक?

भाजपने दावा सोडला?

या मतदारसंघाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना विधान परिषदेत संधी देऊन भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीतील या मतदारसंघातील प्रश्न सोडविला आहे. टिळेकर हे पुन्हा लढण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांचे पुनर्वसन करून भाजपने अप्रत्यक्षपणे आपला दावाही मागे घेतल्याचे बोलले जात आहे.

वसंत मोरेंच्या प्रवेशाने तिढा

वसंत मोरेंच्या पक्ष प्रवेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चुरस वाढली आहे. एकेकाळी शिवसेनेत असलेले आणि नंतर मनसे, वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करून आता मशाल हाती घेतलेले वसंत मोरे हेदेखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ठाकरे गटात पक्षांतर्गत स्पर्धाही तीव्र बनली आहे.

Story img Loader