Kalidas Kolambkar in Wadala Assembly Election 2024 : वडाळा मतदारसंघातून विद्यामान आमदार कालिदास कोळंबकर नवव्यांदा निवडणूक जिंकणार की उलटफेर होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ठाकरे गटाला मताधिक्य मिळाल्यामुळे ही निवडणूक त्यांना थोडी कठीण जाण्याची शक्यता आहे.

वडाळा विधानसभा मतदार संघातून कोळंबकर यांनी सलग आठ वेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. १९९० पासून २००४ पर्यंत शिवसेनेतून कोळंबकर यांनी निवडणूक जिंकली. पहिल्याच निवडणुकीत कोळंबकर यांनी तत्कालीन गृह राज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला होता. तेव्हापासून त्यांनी २०१९ सलग निवडून आले आहेत. पुढे २००५ मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. कोळंबकर यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला होेता. त्यानंतर राणे यांच्याबरोबर कोळंबकर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा पोटनिवडणुकीत ते निवडून आले. त्यानंतर २००६ ते २०१४ या काळात झालेल्या तीन निवडणुकांमध्ये कोळंबकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आणि मतदार संघावर आपले वर्चस्व राखले.

This isn’t the first time that the EC has changed poll dates.
Bishnois : हरियाणाची निवडणूक पुढे ढकलण्यामागे तीन जिल्ह्यांतला बिश्नोई समाज आणि ३०० वर्षांपासूनच्या उत्सवाची परंपरा
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
uday samant and rajan salvi
कोकणात उदय सामंत, राजन साळवी यांच्यातील वाद विकोपाला

हेही वाचा >>>Bishnois : हरियाणाची निवडणूक पुढे ढकलण्यामागे तीन जिल्ह्यांतला बिश्नोई समाज आणि ३०० वर्षांपासूनच्या उत्सवाची परंपरा

२०१४ मध्ये मोदी लाट असताना कोळंबकर यांनी भाजपाचे तत्कालीन उमेदवार मिहिर कोटेचा यांच्याविरुद्ध ८०० मतांनी, निसटता विजय मिळवला. त्यानंतर कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून २०१९ मध्ये आठव्यांदा निवडणूक जिंकली होती. २०१९ विधानसभा निवडणुकीत कोळंबकर यांना वडाळा विधानसभा मतदारसंघात ५६ हजार ४८५ मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या शिवकुमार लाड यांना केवळ २५ हजार ६४० मते मिळालेली. या मतदारसंघात मनसेचे उमेदवार आनंद प्रभू हे तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना एकूण १५ हजार ७७९ मते मिळालेली होती.

गेल्या काही दिवसांपासून मतदार संघात बदल होण्याची शक्यता असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. पण कोळंबकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. यंदाची निवडणूक त्यांना थोडी कठीण जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक मुस्लीम व दलित मतदारांनी मोठ्याप्रमाणात महायुतीविरोधात मतदान केले.

हेही वाचा >>>विनोद तावडे यांचे सांगलीत बेरजेचे राजकारण

मुस्लीम, दलित मते महत्त्वाची…

भाजपच्या चिन्हावर निवडणूक लवढताना मुस्लीम आणि दलित मते आपल्या बाजूने वळवणे कठीण जाणार आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत वडाळा मतदारसंघात ठाकरे गटाला नऊ हजार मते अधिक मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना वडाळा मतदार संघातून ७० हजार ९३१ मतं मिळाली. तर शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांना ६१ हजार ६१९ मतं मिळाली होती.