Andheri West Assembly Election 2024, Congress vs BJP : पश्चिम उपनगरातील अंधेरी पश्चिम हा विधानसभेचा मतदारसंघ म्हणजे खरे तर काँग्रेसचा बालेकिल्ला. गेल्या दोन विधानसभांमध्ये अमित साटम यांनी तो भाजपकडे खेचून आणला. पण बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये या मतदारसंघाने पुन्हा कूस बदलली असून आता कोणत्या पक्षाची पारंपरिक मतपेढी मजबूत राहते यावर अंधेरी पश्चिमचे भवितव्य अवलंबून असेल.

लोकसभेच्या वायव्य मतदारसंघाचा भाग असलेला अंधेरी पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ म्हणजे मुस्लीमबहुल भाग आहे. सुमारे ७५ हजार मुस्लीम मतदार आणि १५ हजार ख्रिाश्चन मतदार असलेल्या या भागात गेली दोन टर्म भाजपचा आमदार निवडून येतो आहे. अमित साटम यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. चार बंगला, सात बंगला, जुहू असा उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित असलेला येथील मतदार सुशिक्षित आणि चोखंदळ मानला जातो. मात्र हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ नसून तो पुन्हा एकदा काँग्रेसकडे खेचून आणण्यासाठी काँग्रेसमधील कार्यकर्ते, नगरसेवक यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका

हेही वाचा >>>जेडीयूचा विरह नि प्रशांत किशोरांचा नवा राजकीय पक्ष; बिहारमधील राजकीय पेचात तेजस्वी यादव काय करणार?

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकरांचे नाव निवडणुकीसाठी जाहीर झाल्यानंतर आधी भाजपच्या कार्यकर्त्यांमधून या नावाला विरोध होता. मात्र नंतर भाजपच्याच आमदारांनी वायकरांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली. वायकर यांना अंधेरी पश्चिम मतदारसंघातून केवळ अडीचशे मताधिक्य मिळाले. तरीही एकूण मतांच्या प्रमाणात वाढ झाल्याने भाजपमध्येही येथून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मुस्लीम उमेदवाराची मागणी

लोकसभेच्या जागावाटपाच्या वेळी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेने आधीच अमोल कीर्तिकरांचे नाव जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसला शांत करण्यासाठी अंधेरी पश्चिम हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहसीन हैदर हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. याआधीच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक जाधव यांचा साटम यांनी पराभव केला होता. या वेळी पुन्हा एकदा जाधव यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र हैदर यांना उमेदवारी मिळावी म्हणून अंधेरीतील मुस्लीम संघटनांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिले आहे. अनेक वर्षे काँग्रेसकडे हा मतदारसंघ असला तरी केवळ १९८० मध्ये या ठिकाणी काँग्रेसने मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व दिले होते. त्या वेळी युसुफ हाफीज हे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे या वेळी अंधेरी पश्चिममध्ये मुस्लीम उमेदवार द्यावा अशी मागणी येथील मुस्लीम संघटनांनी केली आहे.

Story img Loader