Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई मतदारसंघाचा भाग असलेल्या वर्सोवा विधानसभा क्षेत्रातून शिवसेना ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांना मताधिक्य मिळाल्याने विधानसभेतील विजयाबाबतही महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, कीर्तिकर यांच्यासाठी जागा मिळवताना वर्सोवा किंवा अंधेरी पश्चिम यापैकी एक मतदारसंघ सोडण्याबाबत ठाकरे गटातर्फे काँग्रेसला शब्द दिला होता. तो पाळायचा तर पक्षातील बंडखोरीला निमंत्रण द्यावे लागेल, ही भीती ठाकरे गटाला सतावू लागली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सुमारे सव्वा लाख मुस्लिम मतदार असलेल्या या मतदारसंघात पालिका प्रभागस्तरावर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. शिवसेनेतील फुटीनंतर येथील मुस्लिम मतदारांतही ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना जवळपास २१ हजारांचे मताधिक्य मिळाले. कीर्तिकर यांचा पराभव झाला असला तरी, वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील मताधिक्याने ठाकरे गटाला बळ मिळाले आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला येणार का, याबाबत शंका आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच, उद्धव ठाकरे यांनी वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यावर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्यावेळी काँग्रेसला शांत करण्यासाठी वर्सोवा किंवा अंधेरी पश्चिम यापैकी एक विधानसभा मतदारसंघ सोडण्याबाबत चर्चा झाली होती. त्यामुळे आता जागावाटपाच्या चर्चेच्या वेळी काँग्रेसकडून वर्सोव्यासाठी हट्ट केला जाऊ शकतो.
हेही वाचा >>>‘योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार नको!’ लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
वर्सोवा मतदारसंघात २०१९च्या निवडणुकीत भाजपचा सहयोगी पक्ष शिवसंग्राम पक्षाकडून भारती लव्हेकर, काँग्रेसकडून बलदेव खोसा हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यावेळी एकसंध शिवसेनेच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. रिक्षा या नवख्या चिन्हावर निवडणूक लढवूनही पटेल यांनी ३२ हजार मते मिळवली. मात्र, तरीही लव्हेकर यांचा पाच हजार मतांनी विजय झाला. मात्र, पटेल यांची या मतदारसंघातील ताकदही निवडणुकीतून दिसून आली. शिवसेनेतील फुटीनंतरही राजूल पटेल यांनी ठाकरेंबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी त्यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चर्चेदरम्यान दिलेला शब्द पाळायचा की पक्षातील इच्छुकांना सांभाळायचे, असा प्रश्न ठाकरे गटासमोर असेल.
भारती लव्हेकर तिसऱ्यांदा रिंगणात?
विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या डॉ. भारती लव्हेकर या भाजपच्याच चिन्हावर गेल्या दोन निवडणुकांत विजयी होऊन विधानसभेत गेल्या. मेटे यांच्या निधनानंतर ही जागा शिवसंग्राम पक्षाला सुटण्याची शक्यता धूसर आहे. मात्र, लव्हेकर या भाजपमधूनच निवडणूक लढवू इच्छितात. परंतु, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य न मिळाल्याने भाजप त्यांनाच तिसऱ्यांदा उमेदवारी देणार की नवा उमेदवार देणार, याबाबत उत्सुकता आहे. महायुतीत मनसे सहभागी झाल्यास त्या पक्षाच्या शालिनी ठाकरे यादेखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.