हर्षद कशाळकर

अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकेकाळचे अंत्यंत विश्वासू सहकारी असलेले सुरेश लाड भाजपमध्ये दाखल झालेत. त्यामुळे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. मतदार संघात सुधाकर घारे यांचे वाढते प्रस्त आणि पक्षांतर्गत कोंडीमुळे ते नाराज होते. कर्जत खालापूर मधून तीन वेळा सुरेश लाड हे विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र गेल्या निवडणूकीत त्यांचा शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांच्याकडून पराभव झाला होता. तेव्हा पासून ते अडगळीत गेले होते. खासदार सुनील तटकरे यांनी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले, पण त्याची नाराजी काही दूर होऊ शकली नाही. त्यामुळे नंतर तटकरे यांनीही त्यांची समजूत काढणे सोडून दिले.

Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Action against rebels, rebels Akola Rural,
बंडखोरांवर कारवाईचा बडगा, अकोला ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निलंबित
Devendra Fadnavis , Ravi Rana, Mahavikas Aghadi,
विरोधकांच्या डोक्‍याचे नट कसण्‍यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर

याच कालावधीत अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी कर्जत मतदारसंघात सुधाकर घारे यांच्या माध्यातून मतदारसंघातील पक्षाची सुत्र ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले. घारे यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद देऊन त्यांना राजकीय आणि आर्थिक पाठबळ दिले. त्यामुळे पक्षांतर्गत सुरेश लाड यांची अस्वस्थता अधिकच वाढली होती. त्यामुळे ते भाजप मध्ये जाणार असल्याच्या चर्चा सतत सुरू होत्या. पण त्यांनी पक्षप्रवेश केला नव्हता. अजित पवारांच्या यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडानंतर, लाड यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा… नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनातून काय साध्य झाले ?

यानंतर १ डिसेंबरला सुधाकर घारे यांनी कर्जत येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तसेच २ आणि ३ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अधिवेशनाच्या कर्जत येथील आयोजनात घारे यांनी महत्वाची भूमिका बजावली. मतदारसंघातील सुधाकर घारे यांचे वाढेत प्रस्थ हे लाडांसाठी अडचणीचे ठरणार होते. शिवाय शरद पवार गटाच्या जिल्ह्यातील मर्यादा या दोन कार्यक्रमांमुळे स्पष्ट झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन लाड यांनी आपल्या समर्थकांसह भाजप मध्ये प्रवेश केला.

त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणूकीपूर्वी, शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम भाजपमध्ये दाखल झाले होते. आता सुरेश लाडही भाजपमध्ये आल्याने मतदारसंघातील भाजपची ताकद वाढणार आहे. मतदारसंघातील भाजपची वाढते प्रस्थ हे शिवसेनेसाठी अडचणीचे असणार आहे. तर शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकणार आहे. शिवसेनेच्या या मतदारसंघावर आधीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा डोळा आहे. सुधाकर घारे यांच्या माध्यमातून त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. अशातच लाड यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या वाढत्या महत्वाकाक्षा शिवसेनेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

हेही वाचा… पुण्यातील भाजपचे आमदार धास्तावले

मतदारसंघातील एकूण राजकीय समिकरणे लक्षात घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आलेल्या सुरेश लाड यांचे राजकीय पुनर्वसन भाजप कसे करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडून लाड यांचे प्रस्थ वाढू नये यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.