बुलढाणा : ऐंशीच्या दशकात जिल्ह्यात बऱ्यापैकी पाळेमुळे रोवलेल्या शिवसेनेसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पहिली ऐतिहासिक सभा ‘बुस्टर’ ठरली. १९९० च्या फेब्रुवारी महिन्यात मेहकरमध्ये ती जाहीर सभा झाली होती. साधे व्यासपीठ, ध्वनिवर्धक व्यवस्था, हिंदुत्ववादी विचारांनी पेटलेल्या अठरापगड जातीच्या युवकांची भरगच्च गर्दी, असे त्या सभेचे चित्र होते. ती सभा जिल्ह्याच्या राजकारणातील शिवसेनेच्या जोरदार आगमनाची वर्दी देणारी ठरली.

१९९० च्या त्या विधानसभा लढतीत सेनेने बुलढाणा आणि जलंब (आताचा जळगाव जामोद) मतदारसंघात बाजी मारली. त्यानंतर सेनेने मागे वळून पहिलेच नाही! एकसंघ, गटबाजीविरहित सेनेने नंतरच्या सर्व विधानसभा लढतीत किमान दोन आमदार कायम राखले. १९९८ च्या लोकसभेत अचानक संधी मिळालेल्या सेनेने २०२४ पर्यंत आपल्याकडे खासदारकी कायम राखली.

Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’

आणखी वाचा-कोल्हापूरमध्ये पक्षाच्या उमेदवाराविरोधात विरोधकांना उघड मदत

उद्धव ठाकरेंचा ‘मास्टरस्ट्रोक’

या दमदार राजकीय वाटचालीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत उभी फूट पडली असून खासदार, दोन आमदार शिंदे गटात, तर निष्ठावान पदाधिकारी, बहुसंख्येने शिवसैनिक आणि ठाकरे कुटुंबाला मानणारा अराजकीय वर्ग ठाकरे गटात राहिला. मात्र, २०२४ च्या लोकसभा लढाईत ठाकरे गटाचा पराभव झाला. विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटासमोर जिल्ह्यात अस्तित्वाचे संकट उभे राहिले. यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांची उमेदवारी ऐनवेळी बदलून काँग्रेसच्या जयश्री सुनील शेळके यांना देण्यात आली.

…अन् शिंदे गटाचा अंदाज चुकला

मातोश्रीवर प्रवेश आणि त्याचवेळी हातात ‘एबी फॉर्म’ अशा स्थितीत शेळकेंना ठाकरे गटाची उमेदवारी मिळाली. मात्र ‘मातोश्री’ची ही चाल राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’ ठरला. यामुळे शिंदे गटासमक्ष प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासूनच कडवे आव्हान उभे करण्यात ठाकरे गट यशस्वी ठरला. बुधवत किंवा फार झाले तर शेतकरी नेते रविकांत तुपकर उमेदवार राहतील हा शिंदे गटाचा अंदाज चुकला. अनपेक्षितपणे काँग्रेस नेत्या जयश्री शेळके यांच्या हाती मशाल देऊन मैदानात उतरविण्यात आले. यामुळे एरवी विजयाची खात्री असणारे आमदार गायकवाड यांना लढतीची व्युहरचना, प्रचाराचे नियोजन यात बदल करणे भाग पडले.

आणखी वाचा-सांगलीत दादा घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न

जयश्री शेळकेंच्या जमेच्या बाजू कोणत्या?

मतदारसंघात प्राबल्य असलेल्या मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उच्चशिक्षित शेळके यांचे आंबेडकरी चळवळ आणि मुस्लीम समुदायाशी ऋणानुबंध आहेत. याशिवाय त्यांचा शाहू परिवार, दिशा महासंघाच्या माध्यमाने १६०० महिला बचत गटांचे जाळे या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यांचे पती स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांचे कर्मचारी अधिकाऱ्यांत वलय आहे. ओबीसी अधिकारी, कर्मचारी संघटनेचे संस्थापक असल्याने ओबीसी समूहाचे पाठबळ आहे. याचबरोबर मतदारसंघात प्राबल्य असलेल्या काँग्रेसच्या प्रदेश सचिव असल्याने काँग्रेसचे सर्व गट त्यांच्या प्रचाराला लागले आहेत. या अनुकूल बाबींमुळे उच्चशिक्षित शेळके यांनी आमदार गायकवाड यांच्या समक्ष तुल्यबळ आव्हान उभे केले आहे.

आमदार गायकवाड यांना हरवणे सोपे नाही, याची जाणीव शेळके आणि महाविकास आघाडीला आहे. मात्र, ते अशक्यही नाही, असा विश्वास आघाडीला प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच मिळाला आहे. उमेदवारी अर्ज आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेला झालेली गर्दी, त्यातील आक्रमक भाषणे, काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांची नाराजांना तंबी, यामुळे अनुकुल वातावरण तयार झाले आहे.

आणखी वाचा-रोहित पवार-राम शिंदे यांच्यातील लढत लक्षणीय

दोन्ही उमेदवारांकडे साधनसामग्री, कार्यकर्त्यांची फौज, याची कमतरता नाही. बुलढाणा शहरासह खेडोपाड्यात लागलेले दोघांचे फलक, मोठया संख्येने धावणारे प्रचाररथ, समाज माध्यमांवरून होणारा प्रचार तुल्यबळ ठरला आहे.

गायकवाड यांना विकासकामे तारणार?

बुलढाणा मतदारसंघात केलेली विकासकामे ही आमदार गायकवाड यांची ताकद आहे. शहराचे रुपडे त्यांच्यामुळेच पालटले, ही सामान्यांची भावना आहे. त्यामुळे शेळकेंसह आघाडीने विकासाचे फुगीर आकडे, त्यातील फोलपणा, गायकवाड यांची मागील काळातील वादग्रस्त विधाने, युतीच्या काळातील राडे, यावर प्रचाराचा रोख ठेवला आहे. २०१९ मध्ये दीर्घ संघर्ष आणि तीन निवडणुकांतील अपयशानंतर युतीची उमेदवारी शिवसेनेला मिळाली. मात्र, तेव्हा असलेली सहानुभूतीची लाट यंदा नाही. उलट ‘अँटीइन्कम्बन्सी’चे सुप्त तरंग आहेत.

थेट, पण काट्याची लढत

युतीचे मतदान, निवडणुकांचा गाढा अभ्यास, विकासकामे, या जोरावर गायकवाड ताकदीने मैदानात आहेत. तुलनेत मोठ्या निवडणुकांचा अजिबात अनुभव नसणे, ही शेळकेंची कमकुवत बाजू आहे. अशा स्थितीतही यंदाची लढत दोघांनाही सोपी नाही, हे आत्ताच स्पष्ट झाले असून ही लढत काट्याची दुरंगीच आहे. मोठ्यासंख्येने मतविभाजन करण्याइतपत अन्य उमेदवार रिंगणात नसल्याने शेवटच्या क्षणापर्यंत हेच चित्र राहणार आहे.

Story img Loader