मुंबई : शासनात अनेक वर्षे सेवा केल्यावर राजकीय महत्त्वाकांक्षा बळावलेले सहा निवृत्त सनदी अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमवित आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवांचाही समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी स्वीय सचिव बालाजी खतगावकर हे नांदेड जिल्ह्यातील मुखेड मतदारसंघातून रिंगणात आहेत. हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला मिळावा, असे प्रयत्न झाले. पण हा पारंपारिक भाजपचा गड मानला जातो. तुषार राठोड हे भाजपचे आमदार आहेत व पक्षाने त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. खतगवाकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्यावर खतगावकर यांनी मुख्यमंत्र्याच्या सचिवपदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असताना खतगावकर यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणावर निधी मुखेड मतदारसंघासाठी मिळविला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगा स्वीय सचिव हे आर्वी मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत.

आणखी वाचा-कोल्हापूरमध्ये पक्षाच्या उमेदवाराविरोधात विरोधकांना उघड मदत

संभाजी झेंडे, सिध्दार्थ खरात, रामदास पाटील, विजय नाहटा, प्रभाकर देशमुख हे अन्य निवृत्त सनदी अधिकारी निवडणूक मैदानात आहेत. माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, सुमित वानखेडे, सिध्दार्थ खरात हे राजकीय पक्षाचे उमेदवार आहेत. ज्यांना राजकीय पक्षाची उमेदवारी मिळाली नाही. ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाकडून सनदी अधिकारी संभाजी झेंडे हे पुरंदर मतदार संघातून काँग्रेसच्या संजय जगताप यांच्याशी दोन हात करणार आहेत. वास्तविक झेंडे हे शरद पवार यांच्या पक्षात होते. पण पुरंदरची जागा काँग्रेसकडे कायम राहिल्याने झेंडे यांनी टोपी फिरवली. झेंडे हे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मेव्हणे आगहेत.

आणखी वाचा-बुलढाण्यात संजय गायकवाड यांच्यासमक्ष जयश्री शेळकेंचे तुल्यबळ आव्हान; कोण बाजी मारणार?

नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघातून पालिकेचे माजी आयुक्त सनदी अधिकारी विजय नाहटा हे अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेकडून संधी मिळाली नाही. नाहटा यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला. पवार यांनी शेवटच्या क्षणी माजी आमदार संदीप नाईक यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाहटा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. बुलढाणा जिल्हयातील मेहकर मतदार संघात निवडणुकीपूर्वी सहसचिव पदाचा राजिनामा दिलेले सिध्दार्थ खरात शिवसेना ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्याची थेट लढत शिवसेना शिंदे पक्षाच्या संजय रायमुलकर यांच्याशी होणार आहे. हिंगोली मतदार संघात रामदास पाटील हे शासकीय अधिकारी अपक्ष निवडणूक लढवत आहेत. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख गेली अनेक वर्ष इच्छूक होते. यंदा ते अपक्ष लढवीत आहेत.मा‌वळत्या विधानसभेत शामसुंदर शिंदे हे शेकापचे आमदार होते. यंदा स्वत: शिंदे रिंगणात नसले तरी त्यांची पत्नी आशा शिंदे या निवडणूक लढवित आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maaharashtra assembly election 2024 six retired officers are looking trying their luck in election print politics news mrj