सांगली : सांगली विधानसभा मतदार संघात जयश्री पाटील यांच्या काँग्रेस अंतर्गत झालेल्या बंडखोरीमुळे तिरंगी लढतीमुळे जिल्ह्यात लक्ष्यवेधी लढत ठरली आहे. वसंतदादा घराण्यावर काँग्रेसकडून सातत्याने अन्याय होत असल्याची हाकाटी पिटत खा. विशाल पाटील व बंधू माजी खासदार प्रतिक पाटील यांनी सर्व सुत्रे हाती घेतली आहेत. काँग्रेस पक्ष म्हणजे आमचीच जहागिर ही दादा घराण्याची भूमिका पक्षाला कुठे नेणार हाही प्रश्नच आहे. काँग्रेस अंतर्गत होऊ घातलेले मतविभाजन दादा घराण्याची प्रतिष्ठा कायम राखते का पीछेहाटीला कारणीभूत ठरते याचा निर्णय सांगलीकर या निवडणुकीत देणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
श्रीमती पाटील या वसंतदादांच्या स्नूषा व खासदार पाटील यांच्या वहिनी आहेत. त्यांनी अगोदरपासूनच कोणत्याही स्थितीत म्हणजे पक्षाने उमेदवारी दिली तर पक्षाकडून अन्यथा अपक्ष निवडणुक लढविण्याची तयारी केली होती. तर दुसरे इच्छुक शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गेल्या निवडणुकीत अल्प मतांनी पराभव झाल्यापासून २०२४ च्या निवडणुकीची तयारी केली. लोकसभेला विशाल पाटील, विधानसभेला पृथ्वीराज पाटील आणि विधान परिषदेसाठी जयश्री पाटील असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यासमोर ठरले होते असे सांगण्यात येते. मात्र, लोकसभेच्या निकालानंतर स्थिती बदलत गेली. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार पाटील यांना १९,१९२ चे मताधिक्य मिळताच श्रीमती पाटील यांच्या महत्वकांक्षेला नव्याने घुमारे फुटले. आणि त्यांची भाषाही बंडखोरीची होउ लागली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्ष निष्ठा खुंटीला टांगून आता वसंतदादा घराण्याची प्रतिष्ठा पुढे करत आमच्यावर अन्याय झाला असे सांगत बंडखोरीचा मार्ग स्वीकारला.
आणखी वाचा- Yogi Adityanath : ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा देऊन योगी आदित्यनाथ यांनी काय साधलं?
सांगलीकरांनी दादा घराण्यातील लोकांनाच आतापर्यंत खासदारकी, आमदारकी देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. एकेकाळी राज्यातील उमेदवार ठरविण्याचा वचक दादांच्याकडे होता. आज मात्र त्यांना उमेदवारीसाठी अन्य नेत्यांचे उंबरे झिजवावे लागले. अगदी लोकसभा निवडणुकीवेळी जागा वाटपात सांगलीची जागा ताकद नसलेल्या शिवसेना ठाकरे गटाला मिळाली. त्यावेळी अपक्ष मैदानात उतरलेल्या विशाल पाटलांवर अन्याय झाल्याचे जिल्ह्याने मान्य केले. डॉ. कदम यांनीही खुल्या मनाने सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील हालचाली नजरेआड करत काँग्रेस अंतर्गत एकोपा राखण्याचा प्रयत्न केला. निवडून आल्यानंतर खासदार पाटील यांना काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेण्यास सांगितले. इथंपर्यत सारे ठीक होते. पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र, पुन्हा बेचे पाढे पंचावन्न म्हणत दादा घराण्याची फसवणुक होत असल्याचा केला जात असलेला आरोप कितपत मान्य करायचा हाही सांगलीकरासमोर प्रश्नच आहे. तुम्हाला वगळून काँग्रेस पूर्ण होउच शकत नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री. पाटील व बंडखोर श्रीमती पाटील दोघेही आम्हाला भाजपला पराभूत करायचे आहेत असे सांगत आहेत. यामुळे मतदारांचा संभ्रम तर होणार आहेच, पण दादा घराण्याच्या हेतूविषयी संशयास्पद वातावरण निर्माण होत आहे का केले जात आहे याचा विचार करायला कुणाला वेळ नाही. भाजपचे सुधीर गाडगीळ तिसर्यांदा मतदारांना सामोरे जात आहेत. त्यांनी यावेळी निवडणुक लढविणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, पक्षाने पुन्हा त्यांनाच मैदानात उतरण्याचे आदेश दिले. भाजपने त्यांच्या पक्षात होउ घातलेली बंडखोरी टाळण्यात आणि एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची समयसूचकता दाखवली. ती समयसूचकता काँग्रेसला दाखवता आली नाही. याचा फायदा विरोधक म्हणून भाजपने घेतला तर त्यात त्यांची काय चूक? महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सद्यस्थितीला आघाडी धर्माचे पालन करत असल्याचे दिसत असले तरी अंतिम क्षणी कुणाला मदत करणार हे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या आदेशावर अवलंबून आहे.