जयेश सामंत

ठाणे महापालिकेत दहा वर्षे नगरसेवकपद भूषविल्यानंतर ठाण्यातील स्थानिक राजकारणात फारशा सक्रिय नसलेल्या माधवी नाईक यांना भाजपच्या प्रदेश संघटनेत अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सरचिटणीस पदावर बढती देण्यात आल्याने त्यांच्या प्रभावी ठरलेल्या या राजकीय प्रवासाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. वर्षानुवर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले ठाणे शहर हे माधवी नाईक यांचे सुरुवातीचे कार्यक्षेत्र राहिले आहे. महापालिकेतील त्यांच्या कारकिर्दीनंतर मात्र त्यांचा या शहरातील राजकारणावर कधीही प्रभाव दिसून आला नाही. असे असले तरी महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा, त्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष, याच काळात ‘एअरपोर्ट ॲथोरेटी ॲाफ इंडिया’चे केंद्र सरकारनियुक्त संचालकपद आणि आता थेट प्रदेशाच्या सरचिटणीस म्हणून त्यांची झालेली नियुक्ती अनेकांना थक्क करणारी ठरली आहे.

mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा अनेक वर्षापासून बालेकिल्ला राहीला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातही शिवसेनेची सातत्याने सत्ता राहिली आहे. सुरुवातीच्या काळात शिवसेनेचा लहान भाऊ म्हणून ठाण्यात कार्यरत राहिलेल्या भाजपकडे नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांची लक्षणीय अशी फौज कमीच दिसून यायची. जुन्या ठाणे शहरातील काही मतदारसंघावर मात्र भाजपकडून सातत्याने दावा सांगितला जात असे. सध्याच्या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या श्रीरंग सोसायटी, वृंदावन या भागावर भाजपचा सुरुवातीपासून वरचष्मा राहिल्याचे पहायला मिळते. नव्वदच्या दशकात श्रीरंग प्रभागातून माधवी नाईक या भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. पुढे ठाणे महापालिकेची निवडणूक पॅनल पद्धतीने झाली. श्रीरंग, वृंदावन या मराठी बहुल वस्त्यांना राबोडीसारखा मुस्लिम बहूल परिसरही जोडला गेला. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होईल अशी शक्यता दिसत असली तरी याच मतदारसंघातून भाजपकडून मिलिंद पाटणकर आणि माधवी नाईक सगल दुसऱ्यांदा निवडून आल्या. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला आणि ठाण्याच्या राजकारणात त्यांचा सहभागही कमी झाल्याचे पहायला मिळाले. ठाण्यात फारशा सक्रिय नसल्या तरीही नाईक यांची भाजपच्या राज्यस्तरीय संघटनेत वाढणारा प्रभाव मात्र अनेकांसाठी आश्चर्याचे कारण ठरले आहे.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नांदेडचीच निवड का ?

महत्वाच्या पदांवर नियुक्त्या

केंद्रात आणि राज्यात सत्ता नसतानाही भाजपने सातत्याने संघटनात्मक पातळीवर लक्ष केंद्रीत करत पक्ष वाढविण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न केल्याचे पहायला मिळाले. माधवी नाईक यांच्याकडे थेट प्रदेश महिला मोर्चाची जबाबदारी सोपविण्यात आली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुंबईस लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा दबदबा असल्याने या शहरातील एका महिला कार्यकर्तीला थेट प्रदेशाची जबाबदारी देण्याची भाजपची खेळी महत्वाची मानली गेली. या नियुक्तीमुळे ठाणे जिल्ह्यातील पक्षाचे संघटन मजबूत होईल असेही आराखडे त्यावेळी मांडले गेले. प्रत्यक्षात नाईक यांच्या नियुक्तीमुळे ठाणे शहर आणि जिल्ह्यात पक्षाला किती फायदा मिळाला याविषयी भाजपमध्येच वेगवेगळे मतप्रवाह आहेत. २०१४ मध्ये देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता प्रस्थापित होताच भाजपने ठाणे शहर आणि कल्याण डोंबिवलीत शिवसेनेच्या वर्चस्वाला सातत्याने आव्हान देण्याचा प्रयत्न केला. याच काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांचा सहभाग भाजपसाठी महत्वाचा ठरला.

हिजाबनंतर धर्मांतरबंदी कायदा ; कर्नाटकात भाजपची निवडणूक तयारी

असे असताना माधवी नाईक यांना सतत मिळत गेलेल्या पक्षांतंर्गत बढत्या मात्र चर्चेचा विषय ठरल्या. मध्यंतरी केंद्र सरकराने त्यांची एअरपोर्ट ॲथोरेटी ॲाफ इंडियाच्या संचालकपदी नियुक्ती केली. याच काळात भाजपच्या प्रदेश पातळीवर त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नाईक यांची प्रदेश स्तरावर नियुक्ती होत असताना ठाणे भाजपचे अध्यक्ष संदीप लेले यांनाही प्रदेश स्तरावर सचिवपदी नियुक्त केले गेले. प्रदेश स्तरावर नियुक्ती मिळालेल्या या दोन नेत्यांमुळे स्थानिक पातळीवर भाजपला किती फायदा झाला याविषयी पक्षात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. असे असताना भाजपच्या प्रदेश संघटनेत अत्यंत महत्वाच्या मानल्या गेलेल्या सरचिटणीसपदी नाईक यांची झालेली नियुक्ती ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांना अवाक करणारी ठरली आहे.

Story img Loader