मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह एकूण ६९ विद्यमान आमदारांची नावे आहेत. विशेष म्हणजे भाजपाचे नेते तथा विद्यमान मुख्यमत्री शिवाजसिंह चौहान यांच्याविरोधात काँग्रेसने अभिनेता असलेले आणि हनुमानाची भूमिका साकारलेले विक्रम मस्ताल यांना उमेदवारी दिली आहे.

कमलनाथ, गोविंदसिंह यांना पुन्हा तिकीट

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
North Nagpur, Atul Khobragade, Employee Pension,
या अपक्ष उमेदवाराला निवडणुकीसाठी अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिली एक महिन्याची पेन्शन
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात

कमलनाथ हे छिंदवाडा या त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील. तर माजी विरोधी पक्षनेते तथा सात वेळा आमदार राहिलेले डॉ. गोविंदसिंह हे पुन्हा एकदा लाहार मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे पुत्र जयवर्धन सिंह यांनाही काँग्रेसने तिकीट दिले असून ते राघोगड मतदारसंघातून निवडणूक लढवतील.

शिवराजसिंह चौहान यांचा समना करण्यासाठी अभिनेत्याला तिकीट

शारदीय नवरात्रीचा मुहूर्त साधून काँग्रेसने आपल्या उमेदावरांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. शिवराजसिंह चौहान यांच्याविरोधात काँग्रेसने विक्रम मस्ताल यांना उमेदवारी दिली आहे. ते अभिनेते असून त्यांनी २००८ साली भगवान हनुमानाची भूमिका साकारली होती. मस्ताल यांना उमेदवारी देऊन सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारल्याचा संदेश काँग्रेसने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून कमलनाथ हे हनुमानाचे भक्त आहेत, अशी प्रतिमा निर्माण करण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न केला जात आहे. गेल्या निवडणुकीत शिवराजसिंह चौहान यांच्याविरोधात काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र अरुण यादव यांचा पराभव झाला होता. पुढे यादव आणि कमलनाथ यांच्यात राजकीय वाद निर्माण झाल्यामुळे यादव यांना मध्य प्रदेशाच्या राजकारणातून बाजुला करण्यात आले.

पहिल्या यादीत १९ महिला उमेदवारांचा समावेश

काँग्रेसने एकूण १४४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात एकूण ३९ उमेदवार हे ओबीसी, २२ उमेदावार अनुसूचित जाती, ३० उमेदवार अनुसूचित जमाती, सहा उमेदवार अल्पसंख्याक समाजातील आहेत. एकूण १४४ उमेदवारांपैकी १९ महिला उमेदवार आहेत. तर यातील ६५ उमेदवारांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे. म्हणजेच यावेळी काँग्रेसने अधिक तरुणांना संधी दिली आहे.

“काँग्रेसला उमेदवारांवर विश्वास”

काँग्रेसचे प्रवक्ते पियुष बाबेले यांनी या यादीवर प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपाने आपल्या पहिल्या यादीत फक्त ३९ नावे जाहीर केली होती. भाजपाच्या पहिल्या यादीतून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. भाजपा सध्या बचावाच्या पवित्र्यात आहे. भाजपाने शिवराजसिंह चौहान यांच्या नावाचा चौथ्या यादीत समावेश केला. काँग्रेसने मात्र जे उमेदवार याआधीच्या निवडणुकीत विजयी झाले होते, त्यांचा पहिल्याच यादीत समावेश केला. यातून काँग्रेसचा त्यांच्या उमेदवारांवर विश्वास आहे, हे स्पष्ट होते. काँग्रेस ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे, हेही यातून स्पष्ट होते,” असे बाबेले म्हणाले

“भाजपाचा सामना करण्यासाठी आमचे उमेदवार सर्वोत्तम”

काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी भाजपाच्या तुलनेत उशिराने जाहीर केली. यावर बोलताना बालेले म्हणाले की, ” सर्वेक्षण करूनच आम्ही आम्ही तिकीटवाटप केलेले आहे. पक्षाच्या नेतृत्वाशी चर्चा करूनच आम्ही ही यादी अंतिम केली. भाजपाच्या उमेदवारांशी सामना करण्यासाठी आमचे हे सर्वोत्तम उमेदवार आहेत,” असे बालेले म्हणाले.