विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आपली सत्ता कायम राखण्यासाठी यावेळी भाजपाने महिला मतदारांकडे विशेष लक्ष दिले आहे. मध्य प्रदेश निवडणुकीसाठी भाजपाने नुकतेच आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भाजपाने महिला तसेच तरुणांना आकर्षक आश्वासने दिली आहेत.

भाजपा ४५० रुपयांत गॅस सिलिंडर देणार

भाजपाने नुकतेच ९६ पानांचे संकल्प पत्र जाहीर केले आहे. हे संकल्प पत्र प्रसिद्ध करताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव आदी नेते उपस्थित होते. आपल्या या जाहीरनाम्यात भाजपाने दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबातील महिलांना मोफत शिक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले. यात बालवाडी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा समावेश आहे. यासह लाडली बहणा योजना तसेच केंद्राच्या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांना घरगुती गॅस सिलिंडर फक्त ४५० रुपयांना दिला जाईल, असे आश्वासन दिले. काँग्रेसने महिलांना प्रतिमहिना १५०० रुपयांची आर्थिक मदत तसेच ५०० रुपयांना गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिलेले आहे. शिवराजसिंह चौहान यांच्या लाडली लक्ष्मी योजनेप्रमाणाचे काँग्रेसनेदेखील मेरी बिटिया राणी योजनेअंतर्गत मुलींना जन्मापासून ते लग्नापर्यंत २.५१ लाख रुपये दिले जातील, असे आश्वासन दिलेले आहे.

Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
sanjay raut on dhananjay mahadik ladki bahin statement
“…म्हणून महिलांना धमक्या दिल्या जात आहेत”; धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

१०० रुपयांत देणार १०० यूनिट्स वीज

गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांनादेखील अनेक आश्वासनं दिली आहेत. गव्हाला प्रति क्विंटल २७०० रुपये तर तांदळाला प्रति क्विंटल ३१०० रुपये हमीभाव दिला जाईल, असे आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात गव्हाला २६०० रुपये तर तांदळाला प्रति क्विंटल २५०० रुपये हमीभाव देण्याचे आश्वासन दिले आहे. तांदळाच्या बाबतीत हा हमीभाव नंतर ३००० रुपयांपर्यंत वाढवला जाईल, असेही आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेले आहे. भाजपाने मध्य प्रदेशमधील नागरिकांना १०० रुपयांत १०० यूनिट्स वीज देण्यात येईल असे सांगितले आहे.

ओबीसींच्या मतांकडे भाजपाचे विशेष लक्ष

काँग्रेसने ओबीसी मतदारांकडे विशेष लक्ष दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात ओबीसी समाजासाठी वेगवेगळी आश्वासने दिली आहेत. यामध्ये जातीआधारित जनगणना, ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यासाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या जातील, अशा आश्वासनांचा समावेश आहे. तर भाजपानेदेखील ओबीसी समाजाला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासने दिली आहेत. यात विशिष्ट काळात (कालबद्ध) ओबीसी प्रमाणपत्रांचे वाटप केले जाईल, ओबीसी समाजातील मुलांना स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. भव्य लव-कूश मंदीर उभारले जाईल. तसेच ग्वालियरमध्ये धर्मशाळा उभारली जाईल, अशी आश्वासनं दिली आहेत.

तरुणांना आकर्षित करण्यासाठी भाजपाची आश्वासने

मध्य प्रदेशमध्ये आदिवासी समाजाचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे आदिवासी समाजाची मते मिळावीत यासाठी भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात आदिवासी केंद्रित काही आश्वासनं दिली आहेत. आदिवासींच्या विकासासाठी ३ लाख कोटी रुपये खर्च केले जातील, असे भाजपाने म्हटले आहे. भाजपाने तरुणांना आकर्षित करण्यासाठीदेखील अनेक आश्वासनं दिली आहेत. आयआयटीप्रमाणेच मध्य प्रदेशमध्ये प्रत्येक विभागात ‘मध्य प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ तसेच एम्स रुग्णालयाप्रमाणे ‘मध्य प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ रुग्णालयाची स्थापना केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. राज्यात ‘अटल मेडिसिटी’ नावाने एक मेडिकल सिटी उभारण्याचेही भाजपाने आश्वासन दिले आहे.

काँग्रेस देणार बेरोजगार तरुणांना प्रतिमहिना दीड ते तीन हजार रुपये

तर दुसरीकडे काँग्रेसने तरुणांना आकर्षित करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर, बेरोजगारांना प्रतिमहिना १५०० ते ३००० रुपयांची आर्थिक मदत, सरकारी दोन लाख रिक्त जागा भरण्यात येतील तसेच ग्रामीण भागात नव्या १ लाख जागांची निर्मिती केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.