मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सहाव्यांदा बुधनी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ‘ही निवडणूक मी लढवत नाही, तुम्ही लढत आहात. तुम्ही मला निवडून द्या, मी राज्यात भाजपचे सरकार निवडून आणेन’, असे आवाहन शिवराजसिंह बुधनीवासींना करत आहेत.

सिहोर जिल्ह्यातील बुधनी हा शिवराज आणि भाजपचा बालेकिल्ला आहे. ‘राज्यात मामांबद्दल लोक काहीही म्हणत असतील, बुधनीत आम्हाला मामाच हवेत’, असे राजेंद्र पवार या तरुणाचे म्हणणे होते. ‘शिवराजांच्या कारभाराबद्दल नाराजी असल्याचे बोलले जात आहे’, या मुद्द्यावर, ‘मामांनी जसे काम केले तसे भाजपच्या इतर नेत्यांना जमणार नाही. मामा सगळ्यांना सोबत घेऊन काम करतात, मुख्यमंत्रीपदी मामाच पाहिजेत’, असे वयस्क नारायण व्यास यांचे म्हणणे होते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवराजसिंह चौहान यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला होता. उमेदवारांच्या पहिल्या नव्हे तर चौथ्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करून अप्रत्यक्षपणे शिवराजसिंह यांचा अपमान केल्याची चर्चा होत होती. पण, बुधनी मतदारसंघामधील लोकांसाठी शिवराज हेच भाजप सरकार आहेत. ‘आम्हाला थेट मुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश मिळतो. भोपाळसारख्या मोठ्या शहरात तेही मुख्यमंत्र्यांकडे कोणाला जाता येते का? राला गावातून आलो असे सांगितले की, आम्हाला कोणी अडवत नाही’, असे गावकरी सांगत होते. ‘मामा आमच्या साठी मदतीला धावतात. कोणी इतर नेत्यांनी केलेले तुम्ही बघितले आहे का?’, असे राजेंद्र सिंह या ग्रामस्थाचे म्हणणे होते.

mayura kale
“आजवर काय केले तेही सांगत नाही अन् पुढे काय करणार ते पण बोलत नाही,” चर्चेतील टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
maharashtra assembly election 2024 union minister nitin gadkari at a campaign rally of mahayuti candidate in ambad print
जात लोकांच्या नव्हे, तर पुढाऱ्यांच्या मनात! नितीन गडकरी यांचे मत
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
maharashtra assembly election 2024 mim imtiaz ialil vs bjp atul save aurangabad east assembly constituency
लक्षवेधी लढत : एक है तो सेफ है’ विरोधात ‘इत्तेहाद’!

हेही वाचा : ‘महाराष्ट्र मॉडेल वापरून कर्नाटकातील सरकार पडणार’, भाजपाच्या आमदाराचा दावा; आमदारांना ५० कोटी आणि मंत्रीपदाचा प्रस्ताव

‘मी कधीही तुमचा नेता नव्हतो, मी तुमचा मामा आहे, माझ्या बहिणींसाठी मोठा भाऊ आहे. शिडशिडीत अंगकाठीचा हा मामा काय करेल असे कोणाला वाटेल पण, मुख्यमंत्री म्हणून तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी सतत काम करत राहीन’, असे म्हणत शिवराजसिंह बुधनी मतदारसंघातील मतदारांशी भावनिक नाते जोडतात… मी सरकार चालवलेले नाही, मी कुटुंब चालवले आहे… वनवासातून भगवान राम परतले तेव्हा अयोध्यावासी त्यांच्या स्वागतासाठी आले होते, तसेच तुम्ही बुधनीवासी मला आशीर्वाद देण्यासाठी आला आहात… तुम्ही माझ्या मनात, मी तुमच्या मनात… मी मुख्यमंत्री असताना तुम्ही चिंता करू नका, आता आपण आकाशात झेप घ्यायची आहे… माता-भगिनींनो तुमचा भाऊ असताना तुमच्याकडे कोणी डोळे वटारून पाहणार नाही, कोणी ही हिंमत केलीच तर त्याला फाशीवर लटकवू… दुष्टांसाठी मी बुलडोझर चालवायलाही मागेपुढे पाहणार नाही… अशी अनेक भावनेने आतप्रोत भरलेली वाक्ये शिवराजसिंह चौहान यांच्या भाषणात पाहायला मिळतात. ‘कुटुंबवत्सल मामा’ ही ओळख शिवराजांची टिकवलेली आहे. बुधनी मतदारसंघात शिवराज सहकुटुंब-सहपरिवार प्रचार करत आहेत. शिवराज प्रामुख्याने महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना आवाहन करताना दिसतात.

हेही वाचा : सरसंघचालक भागवत यांचे केरळमध्ये इंग्रजीत भाषण; संघाचा इंग्रजीद्वेष मावळण्यामागे कारण काय?

शिवराजसिंह चौहान यांनी १९९० मध्ये पहिल्यांदा बुधनी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २००५ मध्ये शिवराज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि २००६ मध्ये पोटनिवडणूक जिंकून विधानसभेत गेले. त्यानंतर २००८, २०१३, २०१८ अशा सलग तीनवेळा शिवराजसिंह यांनी बुधनीचे प्रतिनिधित्व केले असून २०२३ मध्ये सहाव्यांदा ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या आग्रहामुळे त्यांनी विदिशा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. १९९६ ते २००४ या काळात ते विदिशाचे खासदारचे खासदार होते. भाजपच्या ओबीसी नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबरीने शिवराजसिंह चौहान यांचे नाव घेतले जाते. असे असले तरी, बुधनी मतदारसंघामध्ये ओबीसीच नव्हे तर, ब्राह्मण, ठाकूर, मुस्लिम, मीणा, आदिवासी-दलित अशा सर्व समाजांची मते मिळवण्यात शिवराजसिंह यशस्वी ठरले आहेत.

हेही वाचा : राजस्थानमध्ये RLP-ASP यांच्यात युती, भाजपाला फटका बसणार?

गुजरातचा प्रयोग मध्य प्रदेशमध्येही केला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. गुजरातमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्री दोन्ही बदलले गेले, तसे बदल मध्य प्रदेशमध्येही केले जातील असे मानले जात होते. शिवराजसिंह चौहान यांच्याऐवजी अन्य नेत्याकडे मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते का, याची चाचपणी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केली होती. मात्र, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद हा काटेरी मुकुट असल्याने कोणीही मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाले नाही. त्यामुळे शिवराजसिंह चौहान हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याची चर्चा रंगली होती. यावेळी नरेंद्र तोमर, कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल आदी नेते विधानसभेची निवडणूक लढवत असून मुख्यमंत्रीपदासाठी अनेक स्पर्धक निर्माण झाले आहेत. यावेळी शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर राजकीय आव्हाने असली तरी नम्रपणे ते जनतेला सामोरे जात आहेत.