Madhya Pradesh liquor ban CM Mohan Yadav : मराठा शासक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शुक्रवारी (२४ जानेवारी) एक मोठी घोषणा केली. यादव यांनी राज्यातील १७ धार्मिक शहरांमध्ये मद्यविक्रीवर बंदी जाहीर केली आहे. त्यामध्ये मोहन यादव यांचे जन्मस्थळ असलेल्या उज्जैन शहराचाही समावेश आहे. त्यासह ओरछा, सालकनपूर, चित्रकूट, ओंकारेश्वर, महेश्वर, अमरकंटक व मंदसौरमधील पशुपतीनाथ मंदिर या परिसरांचा समावेश आहे. महेश्वर येथे आयोजित मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या शहरांमध्ये आता मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच या शहरांमध्ये कोणी मद्याची खरेदी-विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. येत्या १ एप्रिलपासून ही दारूबंदी लागू होईल. त्यानंतर हळूहळू संपूर्ण राज्यात दारूबंदी केली जाईल, असे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा