वसई- नालासोपारा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी महायुतीमध्ये चुरस असताना महाविकास आघाडीची मात्र याठिकाणी उमेदवासाठी शोधाशोध सुरू आहे. बदललेल्या राजकीय समीकरणामुळे नालासोपारा जिंकणे कठीण असल्याने महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही घटक पक्षांनी हा मतदारसंघ एकमेकांवर ढकलण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही पक्षांमधून कुणीही उमेदवारी घेण्यास तयार नसल्याची चर्चा असून यामुळे या मतदारसंघात ‘कुणी उमेदवारी घेता का?’ अशी गत महाविकास आघाडीची झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा >>> Dharavi Assembly constituency : धारावीचा उमेदवार कोण? उद्धव ठाकरे काँग्रेसकडून मतदारसंघ मागणार?
पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि बहुचर्चित मतदारसंघ म्हणजे नालासोपारा विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाची मतदारसंख्या ५ लाखांहून अधिक असून सर्वाधिक उत्तर भारतीय मतदार येथे आहेत. बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर हे विद्यमान आमदार असून मागील ३ निवडणुकीत ते जिंकून आले आहेत. तसा नालासोपारा हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला. मात्र २०१९ च्या निवडणुकीत तेव्हाच्या शिवेसना-भाजप युतीच्या प्रदीप शर्मा यांनी त्यांना घाम फोडला होता. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपसाठी अनुकूल मानला जात आहे. भाजपाची उत्तर भारतीयांची पारंपरिक मते आणि पक्षाचा झालेला विस्तार यामुळे भाजपाला विजयाची खात्री आहे. त्यामुळे येथून डहाणूचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत हे देखील इच्छुक होते. आता बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष राजीव पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांनी भाजपाच्या तिकिटावर नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. असे झाल्यास भाजपाचे तगडे उमेदवार राजीव पाटील आणि बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर हे रिंगणात असतील. समोर अशी तुल्यबळ लढत असताना महाविकास आघाडीच्या गोटात मात्र शांतता आहे.
हेही वाचा >>> तळोद्यात भाजप आमदाराविरोधात महाविकास आघाडीत इच्छुकांची रांग
‘माविआ’ला उमेदवार मिळेना
पंकज देशमुख हे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. पुर्वी तेच नालासोपारा मधील उमेदवार असतील असे गृहीत धरले जात होते. गेल्या काही दिवसात राजकीय समीकरणे बदलल्याने महाविकास आघाडीला नालासोपारा जिंकणे कठीण झाले आहे. त्यामुळे पंकज देशमुख यांनी नालासोपारा ऐवजी वसई मतदारसंघाची मागणी केली आहे. नालासोपार्यात काॅग्रेसचे पारंपरिक मतदार नाहीत. त्यामुळे कॉंग्रेसचा एकही नेता येथून तयार झालेला नाही. वसई मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे ५ जणांनी पक्षाकडे अर्ज भरले तर नालासोपार्यातून मात्र एकही अर्ज कुणी भरलेला नाही. महाविकास आघाडीचा तिसरा घटक असलेला शरद पवार राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष येथे औषधालाही नाही. त्यामुळे एकही उमेदवार इच्छुक नसल्याने महाविकास आघाडी पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे माजी नगरसवेक आणि आक्रमक नेता अशी प्रतिमा असलेले धनंजय गावडे यांनी जामिनावर सुटल्यानंतर शहरात सक्रीय राजकारणात पुनरागमन केले आहे. त्यांनी स्वराज्य अभियान या संस्थेमार्फत शहरात संघटनेचे जाळे विणायला सुरूवात केली आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न केले होते. मात्र गावडे यांच्यावर गुन्हे असल्याने त्यांना पक्षात घेणे अडचणीचे ठरू शकणार होते. त्यामुळे त्यांनाही महाविकास आघाडीकडून उमेदवारीची शक्यता तूर्तास दिसत नाही. आगरी सेनेचे कैलास पाटील यांना निवडणूक लढवायची आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत. ही जागा शिंदे गटाकडे नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवून निवडणूक लढविण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
तर महाविकास आघाडीला पाठिंबा ?
नालासोपारा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. बहुजन विकास आघाडीतून राजीव पाटील भाजपात जाऊन उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. राजीव पाटील भाजपात गेल्यास बहुजन विकास आघाडीला मोठा झटका बसणार आहे. पाटील यांना शह देण्यासाठी ते महाविकास आघाडीचा पाठिंबा घेण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडे उमेदवार नसल्याने नाचक्की टाळण्यासाठी महाविकास आघाडी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.