ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप या दोन्ही पक्षांची मोठी ताकद असलेल्या विधानसभेच्या १८ जागांवर महायुतीपुढे कशापद्धतीने आव्हान उभे करायचे याची चाचपणी सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षात सुरु असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिल्ह्यातील सर्वाधिक जागा लढवून या संघर्षाचे नेतृत्व करावे अशापद्धतीची आखणी आघाडीच्या गोटात सुरु आहे. ठाणे जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने चार किंवा पाच तर काॅग्रेसकडून तीन जागा लढवाव्यात असे सुत्र ठरण्याची शक्यता आहे. उर्वरीत सर्व जागांवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार उतरविण्याची तयारी सुरु असून काही ठिकाणी महायुतीतील नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्नही केले जात आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला पराभवाचे तोंड पहावे लागले. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना धक्का बसत असताना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या कोकणपट्टीत मात्र युतीला चांगले यश मिळाले. भिवंडीचा अपवाद वगळला कोकणपट्टीतील सहापैकी पाच जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या मावळमध्येही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळाले. त्यामुळे हा संपूर्ण पट्टा विधानसभेतही पोषक राहील अशी आशा महायुतीचे नेते बाळगून आहेत. ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या एकूण ३१ जागा असून लोकसभा निवडणुकीत यापैकी २४ जागांवर महायुतीला चांगली आघाडी मिळाली होती. लोकसभेचे हे गणित मोडून काढण्याचे मोठे आव्हान यावेळी महाविकास आघाडीपुढे असणार आहे. त्यामुळे पालघर, रायगडसह मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर महायुतीचा प्रभाव कसा कमी राहील याची व्युहरचना आघाडीच्या गोटात केली जात आहे.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Sharad Pawar Ajit Pawar fb
“बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही” म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचा टोला; म्हणाले…
sharad pawar road show chinchwad assembly constituency rahul kalate
भाजपच्या चिंचवडच्या गडात शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो; नागरिकांचा प्रतिसाद
maharashtra assembly election 2024 narahari jhirwal vs sunita charoskar dindori assembly constituency
लक्षवेधी लढत : झिरवळ सलग तिसऱ्या विजयाच्या प्रयत्नात
Thane district Pipani trumpet election symbol NCP Sharad Pawar
ठाणे जिल्ह्यात ‘पिपाणी’मुळे ‘तुतारी वाजविणाऱ्यां’ची डोकेदुखी ?

हेही वाचा >>>चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला घराणेशाहीचे ग्रहण!

ठाणे जिल्ह्यात आघाडीची मदार शिवसेनेवरच

लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील तीनपैकी दोन जागांवर महायुतीला यश मिळाले. ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघातील कळवा-मुंब्रा या एकमेव विधानसभा मतदारसंघ वगळला तर उर्वरीत ११ विधानसभा क्षेत्रात महायुतीला चांगले मताधिक्य आहे. भिवंडीत मुरबाड, भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम या तीन विधानसभा क्षेत्रात महायुतीचे कपील पाटील आघाडीवर राहीले. जिल्ह्यातील १८ पैकी १४ विधानसभा क्षेत्रात मोठे मताधिक्य मिळाल्याने महायुतीचा हा गड भेदण्याचे मोठे आव्हान यंदा महाविकास आघाडीपुढे असणार आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या चर्चेत जिल्ह्यातील प्रत्येक जागेवर आघाडीत वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी सुरु असून महायुतीतील काही नाराज नेते गळाला लागतात का याचेही प्रयत्न केले जात असल्याचे वृत्त आहे. सद्यस्थितीत कळवा-मुंब्रा, बेलापूर, उल्हासनगर आणि शहापूर या चार जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेसला सोडण्याचे जवळपास निश्चित झाले असून मीरा-भाईदर, भिवंडी पश्चिम आणि भिवंडी पुर्व या तीन जागा काॅग्रेसला सोडण्याविषयी चर्चा सुरु आहे. भिवंडी पुर्वेत सध्या समाजवादी पक्षाचे रईस शेख हे आमदार असून ही जागा या पक्षासाठी सोडली जाऊ शकते, अशी माहिती महाविकास आघाडीतील एका नेत्याने लोकसत्ताशी बोलताना दिली. दरम्यान मुरबाडमध्ये ऐनवेळेस शरद पवारांकडून उमेदवार दिला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा क्षेत्रात भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत उमेदवारीवरुन वाद सुरु असून या पक्षामधील नाराज गळाला लागतात का याची चाचपणी आघाडीच्या गोटात सुरु असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला म्हणावे तसे यश मिळाले नसले तरी विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल. जिल्ह्यातील प्रत्येक जागेवर एकमेकांना पुरक ठरतील असे उमेदवार आघाडीकडून दिले जाणार आहेत. जागा वाटप जवळपास निश्चित झाले असून दोन ते तीन जागांवर वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी सुरु आहे, अशी माहिती महाविकास आघाडीती एका नेत्याने लोकसत्ताला दिली.