संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच विविध भाजप नेत्यांकडून करण्यात येणारा अपमान, सीमा प्रश्वावर भाजपशासित कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची चिथावणीखोर भाषणे यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडी तसेच विविध समविचारी पक्षांनी शनिवारी मुंबईत आयोजित केलेल्या मोर्च्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, विविध डावे पक्ष, शेकाप, विविध संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. जे. जे. रुग्णालयाजवळून हा मोर्चा निधेल व आझाद मैदानात त्याचा समारोप होईल. आझाद मैदानाजवळ नेतेमंडळींची भाषणे होतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे हे उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा… माना पाव में छाले है, हम नही रुकनेवाले है; १०० दिवसानंतर भारत जोडो यात्रेत पुन्हा नवा उत्साह !

सोमवारपासून सुरू होणाऱया विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपला अडचणीत आणण्याची ही खेळी आहे. शिवसेनेला मुंबईत आपली ताकद दाखवायची आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण करण्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शक्तिप्रदर्शनाची संधी मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईतील काँग्रेस संघटनेत मरगळ आली आहे. राष्ट्रवादीची संघटना मुंबईत फारच कमकुवत आहे. मोर्चाच्या निमित्ताने सर्वच पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्याचा प्रयत्न करतील.

हेही वाचा… किशोर कुमेरिया : लढवय्या शिवसैनिक

सुमारे लाखभर लोक जमवून सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांनी दबाव आणला म्हणून भाजपचे केंद्रीय नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लगेचच बदलण्याचीही शक्यता कमी आहे. पण राष्ट्रपुरुषांच्या अपमानावरून भाजपची कोंडी करण्याची महाविकास आघाडीची खेळी आहे.