दिगंबर शिंदे
सांगली : शिराळा मतदार संघात आगामी विधानसभेसाठी भाजपअंतर्गत महाडिक आणि देशमुख गट एकत्र आला असून ज्याला उमेदवारी मिळेल, त्याच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी उभे राहण्याचे दोन्ही गटप्रमुखांनी मान्य केले आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी गेल्या गुढी पाडव्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपमध्ये झालेली गणितांची वजाबाकी बेरजेेत परावर्तित करण्यासाठी बाजार समितीबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी महाडिकांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वाळवा बाजार समितीसाठीही या गटाने कंबर कसली असून भाजपचा झेंडा हाती न घेता स्वबळाचे मोजमाप वाळवा तालुक्यात किती हे अजमावण्याचे प्रयत्न या गटाचे सुरू आहेत.
शिराळा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे मानसिंगराव नाईक सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या नाईकांच्या संस्थांना पाठबळ देउन पुन्हा उभारी द्यायची, या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवाजीराव नाईक यांचा प्रवेश झाला. याचे परिणाम दृष्य स्वरूपात आता दिसू लागले असून ग्लुकोज प्रकल्प कार्यान्वीत होत असून शिवाजी केन कारखानाही पुढील हंगामात चालू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिराळा तालुक्यातील 1१०३ गावे व दोन वाड्या आणि वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा शिराळा मतदार संघ.
हेही वाचा… एकाच कामाच्या चौकशीसाठी दोन समित्या
नाईकांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या आ. नाईक यांना विरोधच उरला नसल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी वाळवा तालुययातील महाडिक गटाच्या माध्यमातून सम्राट महाडिक आणि जिल्हा बॅकेचे संचालक राहूल महाडिक यांनी बस्तान बसविण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. विधानसभेची उमेदवारीवर महाडिकांचा दावा प्रबळ मानला जातो ते मागील विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष रिंगणात उतरून घेतलेली५० हजार मते यामुळेच. देशमुख यांचा प्रभाव प्रामुख्याने कोकरूड, बिळाशी, चरण या गावावर आहे. मात्र, वाळवा तालुययातील ४८गावे ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचा प्रभाव असणारी आहेत. खुद्द प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांचे कासेगाव शिराळा मतदार संघामध्ये आहे.
हेही वाचा… वादाचे दुसरे नाव काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे!
चिखलीच्या दोन्ही नाईकांमध्ये समेट घडला असला तरी भाजपचे या ठिकाणी महाडिक गटाला ताकद देउन हा मतदार संघ पुन्हा भाजपकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले असून यादृष्टीने महाडिक-देशमुख गटात समेट घडवून आणला आहे. आता यापुढची तयारी असेल ती उमेदवारी मिळविण्यासाठीची असेल. मात्र, तत्पुर्वी वाकुर्डे योजनेला मिळालेला५६२ कोटींचा निधी कोणाच्या प्रयत्नामुळे मिळाला यावरून श्रेयवादाची लढाई भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे. शिराळ्याचा उत्तर भाग आजही पाण्यापासून वंचित राहिला आहे. दुष्काळी भागाची तहान आणि शेतीच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था करणारे चांदोली धरण याच तालुययात असताना वाकुर्डे योजनेचा हत्ती गती घेउ शकलेला नाही. कोणी प्रयत्न केले नाहीत असे नाही, मात्र, आताच या योजनेसाठी निधीची व्यवस्था कशी तातडीने करता आली हाही प्रश्न आहेच. श्रेयवादाच्या लढाईमध्ये पुन्हा रखडपट्टी न परवडणारी आहे.
हेही वाचा… शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना के. चंद्रशेखर राव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ची भुरळ
शिराळा मतदार संघ वेगळा असला तरी या मतदार संघाचे लागेबांधे वाळवा तालुक्यातील ४८ गावांत आहेत. यामुळे राष्ट्रवादीला हा मतदार संघ दोन्ही नाईकांमधील समेटामुळे सोपा वाटत असला तरी महाडिक-देशमुख यांच्या मनोमिलनाने चुरस वाढणार आहे. गावपातळीवरील राजकीय संघषा्रमुळे नेते एकत्र आले तर कार्यकर्ते एकत्र येण्याची प्रक्रिया बिनबोभाट होईलच असे नाही. याच स्थितीचा लाभ घेण्याच्या प्रयत्नात सध्या भाजप आहे. बाजार समितीची निवडणुक हे निमित्त, लक्ष्य मात्र विधानसभा असणार आहे.