Akola Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होत असल्याचे चित्र आहे. यामध्ये जातीय समीकरण कळीचा मुद्दा ठरेल. विविध समाजाच्या मतांचे गणित जुळवण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. निवडणुकीमध्ये जातीय समीकरणच निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

अकोला जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत जातीय समीकरणच प्रभावी ठरल्याचा प्रत्यय वारंवार येतो. अकोला पूर्व मतदारसंघात भाजपचे रणधीर सावरकर मराठा, शिवसेना ठाकरे गटाचे गोपाल दातकर कुणबी, तर वंचित आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने धनगर समाजातून येतात. या तिन्ही समाजाची मोठी मतपेढी मतदारसंघात आहे. याशिवाय माळी, कोळी, हिंदी भाषिक, दलित, मुस्लीम आदींसह विविध समाजाचे देखील बहुसंख्य मतदार आहेत. संबंधित उमेदवारांचा आपल्या जातीच्या मतांवर प्रथम दावा आहे. मात्र, जाती अंतर्गत मतभेद व पक्षीय बांधिलकीतून मतांची फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकोला पूर्वमध्ये तिरंगी लढत होत आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात अग्रवाल समाजातून भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे साजिद खान पठान मुस्लीम, भाजपचे बंडखोर हरीश आलिमचंदानी सिंधी, प्रहारचे डॉ. अशोक ओळंबे मराठा पाटील, तर शिवसेना ठाकरे गटाचे राजेश मिश्रा हिंदी ब्राह्मण समाजातून येतात. अकोला पश्चिममध्ये भाजपतील बंडखोरीमुळे हिंदू मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन होईल. ते टाळण्याचे लक्ष्य भाजपपुढे राहील. मतविभाजनावरच येथील समीकरण अवलंबून राहणार आहे.

maharashtra assembly election 2024, Mahayuti Campaign, Palghar, Dahanu,
महायुतीच्या प्रचारात गुजरातमधील निरीक्षकांची देखरेख
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
maharashtra vidhan sabha election 2024,
पलूसमध्ये विश्वजित कदम, संग्रामसिंह देशमुखांमध्ये चुरशीची लढत
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
ambrishrao Atram Aheri, Aheri, BJP Aheri,
अहेरीत अम्ब्रीशराव आत्रामांना भाजपचा छुपा पाठिंबा? बंडखोरीनंतरही पक्षाकडून कारवाई नाही
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Akola Western Hindu votes, BJP problem polarization,
बालेकिल्ला राखण्याचे भाजपपुढे कडवे आव्हान, अकोला पश्चिममध्ये हिंदू मतांच्या ध्रुवीकरणामुळे मोठी अडचण

हेही वाचा – अहेरीत अम्ब्रीशराव आत्रामांना भाजपचा छुपा पाठिंबा? बंडखोरीनंतरही पक्षाकडून कारवाई नाही

बाळापूर मतदारसंघात जातीनिहाय मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. देशमुख समाजातून शिवसेना ठाकरे गटाचे नितीन टाले, मुस्लीमांमधून वंचितचे नातिकोद्दिन खतीब, तर शिवसेना शिंदे गटाचे बळीराम सिरस्कार माळी समाजातून येतात. मतदारसंघात प्रमुख तिन्ही उमेदवारांचे गठ्ठा मतदान आहे. हे लक्षात घेऊन पक्षांनी त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले. राष्ट्रवादीचे कृष्णा अंधारे यांनी बंडखोरी केली असून ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे मराठा मतांची देखील विभागणी होऊ शकते.

मूर्तिजापूर मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. मतदारसंघात मराठा, दलित, मुस्लीम, माळी, बंजारा, तेली, धनगर आदी समाज बहुसंख्येने आहेत. भाजप उमेदवार हरीश पिंपळे हे गुरुड जातीतून येतात. वंचितचे डॉ. सुगत वाघमारे, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे व एमआयएमचे सम्राट सुरवाडे हे बौद्ध समाजातून येत असल्याने मोठ्या प्रमाणात मतविभाजन होण्याची शक्यता आहे. मराठा समाजाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अकोट मतदारसंघातील भाजपचे प्रकाश भारसाकळे मराठा, काँग्रेसचे महेश गणगणे माळी, तर वंचितचे दीपक बोडके हे बारी समाजातून येतात. या मतदारसंघातसुद्धा जातीय समीकरण निर्णायक ठरू शकते.

हेही वाचा – शहरापेक्षा नागपूर ग्रामीणमध्ये चुरस अधिक, कुठे बंडखोरी, तर कुठे प्रस्थापितविरोधी लाट

‘जात फॅक्टर’ महत्त्वपूर्ण

प्रमुख राजकीय पक्षांनी जातीय राजकारण लक्षात घेऊनच उमेदवारांना संधी दिली. ‘जात फॅक्टर’ जुळवून येईल, या दृष्टीने राजकीय पक्षांनी रणनीती आखली. त्यात बंडखोरांमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे.

Story img Loader