अमरावती : जिल्‍ह्यात आठ मतदारसंघांपैकी अनेक ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र असले, तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्‍ये मुख्‍य लढत आहे. महाविकास आघाडीला अस्तित्‍व कायम राखण्‍याची संधी असताना महायुतीसमोर गतवैभव प्राप्‍त करून देण्‍याचे आव्‍हान आहे. दोन जागांचा अपवाद वगळता इतर ठिकाणी झालेली बंडखोरी तसेच ‘अ‍ॅन्‍टी इन्‍कबन्‍सी’चा सामना प्रस्‍थापितांना करावा लागत असून नव्‍या उमेदवारांनी यावेळी लढतीत रंगत आणली आहे.

अमरावती राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि काँग्रेसमध्ये मुख्‍य लढतीचे चित्र असताना भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्‍ता यांच्‍या उमेदवारीने या लढतीतील उत्‍कंठा वाढवली आहे. राजकारणातील तीन दिग्‍गज या निवडणुकीत समोरा-समोर आले आहेत. मतांच्‍या ध्रुवीकरणाच्‍या आधारे राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या सुलभा खोडके आणि काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांच्‍या भवितव्‍याचा फैसला होणार आहे.

wardha Aam Aadmi Party which helped Amar Kale win taken candidate wise stance now
आघाडीस धक्का! ‘ आप ‘चा दोन ठिकाणी आघाडीस तर दोन ठिकाणी अपक्षास पाठिंबा.
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
maharashtra vidhan sabha election 2024 path of Mahayuti and Mahavikas Aghadi is difficult due to major rebel candidates in akola and vashim
प्रमुख बंडखोरांमुळे महायुती व मविआची वाट बिकट
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
maha vikas aghadi face rebels Challenges in yavatmal district
बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?
बंडखोरीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; ‘अकोला पश्चिम’मध्ये हरीश आलिमचंदानींच्या भूमिकेकडे लक्ष; रिसोडमध्ये महायुतीत मिठाचा खडा
close race between Kamala Harris and Donald Trump in US election 2024
अमेरिकेत अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात अभूतपूर्व चुरस! अधिक मते मिळूनही होऊ शकतो पराभव?
maharashtra vidhan sabha election 2024 cm eknath shinde strict stance against rebels in shiv sena
तुम्ही कामाला लागा, महायुतीतल्या विरोधकांना मी बघून घेतो; बंडखोर आणि नाराजांबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

हेही वाचा – गावतुरे यांच्या बंडखोरीने बल्लारपूरमध्ये काँग्रेस अडचणीत

बडनेरातील बहुरंगी लढत रंजक वळणावर पोहचली असून युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे सुनील खराटे, शिवसेनेच्‍या बंडखोर अपक्ष उमेदवार प्रीती बंड आणि भाजपचे बंडखोर तुषार भारतीय यांच्‍यातील मुकाबल्‍यात जातीय समीकरणे महत्‍वाची ठरणार आहेत. गेल्‍या तीन निवडणुकांमध्‍ये मतविभाजनातून रवी राणा यांना विजयाची संधी मिळाली होती. मात्र, यावेळी त्‍यांच्‍यासमोर प्रस्‍थापित विरोधी मतांचा प्रवाह रोखण्‍याचे आव्‍हान आहे.

मोर्शीतून राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) देवेंद्र भुयार, भाजपचे उमेश यावलकर, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) गिरीश कराळे आणि अपक्ष विक्रम ठाकरे यांच्‍यात लढतीचे चित्र आहे. कुणबी, माळी आणि मुस्‍लीम मतांच्‍या विभागणीवर विजयाचे गणित ठरणार आहे. धामणगाव रेल्‍वेत भाजपचे प्रताप अडसड, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप आणि वंचित बहुजन आघाडीचे नीलेश विश्‍वकर्मा यांच्‍यात पुन्‍हा एकदा तिहेरी लढतीचे चित्र आहे.

तिवसामध्‍ये काँग्रेसच्‍या यशोमती ठाकूर आणि भाजपचे राजेश वानखडे यांच्‍यात थेट लढत आहे. राजेश वानखडे हे गेल्‍यावेळी शिवसेनेकडून रिंगणात होते. काँग्रेसचा हा पारंपरिक गढ टिकवून ठेवण्‍याचे कौशल्‍य यशोमती ठाकूर यांना दाखवावे लागणार आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्‍या दर्यापुरात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे गजानन लवटे आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे अभिजीत अडसूळ यांच्‍यात सामना आहे. युवा स्‍वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले यांच्‍या उमेदवारीने निवडणुकीतील रंगत वाढवली आहे. बौद्ध समाजाची मते या ठिकाणी निर्णायक ठरू शकतील.

हेही वाचा – पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते

अचलपूरमध्‍ये प्रहार जनशक्‍ती पक्षाचे बच्‍चू कडू यांच्‍यासमोर काँग्रेस आणि भाजपने आव्‍हान उभे केले असताना आपली नौका पैलतिरी नेण्‍याची कडू यांची धडपड आहे. भाजपचे बंडखोर प्रमोदसिंह गड्रेल यांनी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. जातीय संवेदनशील मानल्‍या गेलेल्‍या या मतदारसंघात मतांचे ध्रुवीकरण महत्‍वाचे ठरणार आहे.

मेळघाटमध्‍ये प्रहारचे राजकुमार पटेल, भाजपचे केवलराम काळे आणि काँग्रेसचे डॉ. हेमंत चिमोटे यांच्‍यात तिरंगी मुकाबला आहे. ही लढत तूल्‍यबळ मानली जात आहे. राजकुमार पटेल यांनी महायुतीला साथ दिली आणि नंतर नाईलाजाने प्रहारचा झेंडा हाती घ्‍यावा लागला. केवलराम काळे यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपची उमेदवारी मिळवली. या दोघांसमोर जुन्‍या लोकांना एकत्रित करण्‍याचे आव्‍हान आहे.