अमरावती : गेल्‍या निवडणुकीपेक्षा पाच ते सहा टक्‍क्‍यांनी वाढलेल्‍या मतदानामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्‍या कार्यकर्त्‍यांची धडधड वाढली आहे. पाच वर्षांपुर्वी अमरावती जिल्‍ह्यात ६०.५७ टक्‍के मतदान झाले होते. यावेळी मतदानाची आकडेवारी ६५.५७ टक्‍क्‍यांपर्यंत पोहचली. मतदानाची वाढलेली टक्‍केवारी ही सत्‍ताधाऱ्यांसाठी अडचणीची मानली जाते. त्‍याचे परिणाम निकालावर पडतील का, याची उत्‍सुकता आहे.

या निवडणुकीत सोयाबीन आणि कापसाचे कोसळलेले दर, पक्षांची फोडाफोडी, त्‍याविषयी मतदारांमध्‍ये व्‍यक्‍त होणारा राग, लाडकी बहीण योजना, व्‍होट जिहाद, कटेंगे तो बटेंगे या नाऱ्यांमधून भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्‍न याचा प्रचारात दिसून आला. अखेरच्‍या टप्‍प्‍यात लक्ष्‍मीदर्शन देखील चर्चेत आले.

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका

हेही वाचा >>>दिग्गजांच्या मतदारंघातील वाढलेले मतदान कोणाच्या पत्थ्यावर ?

जिल्‍ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्‍ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्‍यात तीव्र स्‍पर्धा दिसून आली. अमरावती, बडनेरा, दर्यापूर या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीत झालेल्‍या बंडखोरीचा मोठा परिणाम निकालावर होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. दलित, मुस्‍लीम आणि कुणबी (डीएमके) हा घटक या निवडणुकीत निर्णायक ठरला. हा घटक महाविकास आघाडीसाठी लाभदायक ठरल्‍याचे चित्र आहे.

जिल्‍ह्यात कापूस आणि सोयाबीन उत्‍पादक शेतकऱ्यांची संख्‍या मोठी आहे. यंदा हंगामाच्‍या सुरूवातीपासूनच सोयाबीनचे दर कमी झालेले होते. सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्‍क वाढवून दिलासा देण्‍याचा प्रयत्‍न केला. पण, त्‍यामुळे सोयाबीनचे दर वाढले नाहीत, उलट खाद्यतेलाच्‍या किमती भडकल्‍या. त्‍याची मोठी नाराजी शेतकरी आणि सर्वसामान्‍यांमध्‍ये व्‍यक्‍त झाली. तरीही लाडकी बहीण योजनेचा आधार मिळेल, अशी अपेक्षा महायुतीला आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्‍याने ही योजना लागू करण्‍यात आल्‍याने राजकीय स्‍वार्थासाठी ही योजना आणल्‍याची चर्चा लाभार्थी महिलांमध्‍ये रंगली. ऐन दिवाळीत सोयाबीन अल्‍प दरात विकावे लागले आणि महाग झालेले खाद्यतेल विकत घ्‍यावे लागले, याचा राग मतदारांनी कितपत व्‍यक्‍त केला, याचीही उत्‍सुकता आहे.

हेही वाचा >>>मूळ प्रश्न झाकोळले, फक्त काय‘द्या’चं बोला!

गेल्‍या काही वर्षांतील राजकीय उलथापालथ, फोडाफोडीचे राजकारण याचा परिणाम जिल्‍ह्याच्‍या राजकारणावरही उमटले. हिंदुत्‍वाच्‍या मुद्यावर लोकसभा निवडणूक गाजली. भाजपच्‍या नवनीत राणा यांचा धक्‍कादायक पराभव झाला. पण, त्‍यामुळे सुडाचे राजकारण पेटले. नवनीत राणा आणि त्‍यांचे पती रवी राणा यांनी दर्यापूर, अमरावतीत महायुतीच्‍या उमेदवारांच्‍या विरोधात उघड प्रचार केला. त्‍याचा कितपत प्रभाव पडला, हाही सध्‍या चर्चेचा विषय बनला आहे.

प्रचाराच्‍या शेवटच्‍या टप्‍प्‍यात भाजपने धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्‍न केला. लोकसभा निवडणुकीत हा प्रयोग मतदारांनी नाकारला होता. तरीही विधानसभा निवडणुकीत अचलपूर, तिवसा, मोर्शी, धामणगाव रेल्‍वे या मतदारसंघांमध्‍ये भाजपने ही जोखीम पत्‍करली. महायुतीतील अंतर्गत विरोधाभास देखील या निवडणुकीत दिसून आला.

Story img Loader