माढा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पंढरपूर : लोकसभेप्रमाणे माढा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीतही गाजत आहे. या मतदारसंघाचे तब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व करणारे बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यंदा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे पंढरपूर येथील विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या मीनल साठे रिंगणात आहेत. ही लढत जरी दोन्ही राष्ट्रवादी आणि एक अपक्ष अशी असली तरी यातील प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई मात्र बबनराव शिंदे आणि मोहिते पाटील यांच्यात असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
बबनराव शिंदे हे जरी निवडणूक लढवत नसले, तरी त्यांच्याकडे सहा निवडणुका लढवण्याचा अनुभव आहे. अनेक गावांत विकासकामांबरोबर त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्यामुळे शिंदेंपुढे आव्हान उभे करणे तसे सोपे नाही. यंदा अनेक जण शरद पवार पक्षातर्फे उमेदवारीसाठी इच्छुक होते. आमदार शिंदे यांनीदेखील पवारांची भेट घेतली. मात्र, शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तर पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हेही इच्छुक होते. मात्र, त्यांनीही लोकसभेच्या वेळी मोहिते-पाटील यांचा प्रचार थांबवून फडणवीस यांना मदत केली. मात्र, विधानसभा निवडणुकी वेळी त्यांनी पुन्हा पक्ष बदल करत आघाडीची साथ पकडली आहे. शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा आणि मोहिते-पाटील यांची साथ या पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत.
हेही वाचा >>> लक्षवेधी लढत : खासदार पत्नी विरुद्ध फडणवीसांचे विश्वासू असा सामना
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने माढाच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांना उमेदवारी दिली आहे. त्या मूळच्या काँग्रेस पक्षाच्या. त्यांच्या घराण्याचाही तालुक्यातील अनेक गावांवर प्रभाव आहे. त्यामुळे साठे काँग्रेस आणि त्यांच्या संपर्कातील नेमकी कुणाच्या हिश्शाची मते घेणार, यावरही निकालाचे गणित अवलंबून आहे. शिंदे-पाटील तुल्यबळ लढत, त्याला असलेला हा साठे यांचा तिसरा कोन या साऱ्यांमुळे माढ्याचा निकाल हा उत्सुकतेचा बनला आहे.
निर्णायक मुद्दे
● विजयसिंह मोहिते-पाटील आणि बबनदादा शिंदे यांच्यातील वादाची या मतदारसंघात किनार आहे.
● पाणी, शेती हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात. गेल्या काही वर्षांत या मतदारसंघात पाणी, रस्ते हे दोन मुख्य प्रश्न सुटलेले आहेत.
● विकासकामे, साखर कारखान्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात असलेला संपर्क असे असले, तरी मोहिते-पाटील यांच्याशी असलेले राजकीय वैमनस्य हे सध्या शिंदे यांच्यापुढे आव्हान आहे.
लोकसभेतील राजकीय चित्र
● महाविकास आघाडी १,२२,५७०
● महायुती : ७०,०५५