जळगाव- विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने जिल्ह्यात स्वपक्षाविरोधात बंड पुकारणाऱ्यांविरोधात भाजपने कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु, अशा कारवाईत सर्व बंडखोरांना समान न्याय देण्याऐवजी माजी खासदारासह काही जणांना मोकळीक देण्यात आल्याने कारवाईवरून संशय बळावला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी न ऐकणाऱ्या बंडखोरांसाठी पक्षाची दारे सहा वर्षांसाठी बंद होतील, असा इशारा अर्ज माघारीच्या एक दिवस आधीच दिला होता. त्यानुसार भाजप प्रदेश कार्यालयाने ३७ मतदारसंघातील पक्षाचा आदेश न जुमानणाऱ्या ४० बंडखोरांवर कारवाई केली आहे.

शिस्तभंग केल्याबद्दल संबंधितांची पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आली आहे. त्यामध्ये जळगाव शहर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी करणारे माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे तसेच माजी नगरसेवक मयूर कापसे यांचाही समावेश आहे.

Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
thane assembly constituency sanjay kelkars strength with candidature of ubt rajan vichare for maharashtra vidhan sabha election 2024
Thane Vidhan Sabha Constituency : राजन विचारेंच्या उमेदवारीने ठाण्यात संजय केळकर यांना बळ
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा >>> ‘आम्ही काहीही करू शकतो’, मिथुन चक्रवर्तींची अमित शाहांसमोरच मुस्लीमांना धमकी; पश्चिम बंगालचे राजकारण तापले

पाचोरा मतदारसंघात भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी केली आहे. तसेच भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील यांनी एरंडोल मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार अमोल पाटील यांच्या विरोधातील अपक्ष अर्ज मागे घेतला नाही. दोघांनी बंडखोरी करून शिंदे गटासमोर आव्हान निर्माण केले आहे. परंतु, भाजपकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये ए. टी. पाटील आणि अमोल शिंदे यांचा समावेश नाही. त्यामुळे भाजपकडून शिस्तभंग कारवाईत दुजाभाव करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

हेही वाचा >>> अकोला जिल्ह्यात तुल्यबळ लढतींची रंगत; जातीय राजकारण व मतविभाजन निर्णायक ठरणार

विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. संबंधितांवर आता टप्याटप्याने शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे. ज्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढायची आहे, त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा तातडीने दिला पाहिजे. – डॉ.राधेश्याम चौधरी (लोकसभा क्षेत्र प्रमुख, जळगाव भाजप)

Story img Loader