मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारचा दिवस सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी सत्कारणी लावला. कार्यालयांना सुटी असल्यामुळे घरी असलेल्या मतदारांना गाठण्यासाठी उमेदवारांनी घरोघरी भेटींचा मुहूर्त साधलाच पण गृहनिर्माण संकुलांच्या भेटीगाठी घेऊन एकगठ्ठा मतांचीही बेगमी करण्याचीही संधी उमेवारांनी साधली.

विधानसभा निवडणुकीला आता अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यापासून हा पहिलाच रविवार उमेदवारांना प्रचारासाठी मिळाला होता. गेल्या रविवारी भाऊबीज असल्यामुळे उमेदवारांना फारसा प्रचार करता आला नाही. तर पुढचा रविवार हा प्रचाराचा शेवटचा रविवार आहे. मात्र त्यादिवशी बहुतांशी राजकीय पक्षांच्या मोठ्या सभा आहेत. त्यामुळे १० नोव्हेंबरचा रविवार उमेदवारांनी सार्थकी लावला.

maharashtra vidhan sabha election 2024 ajit pawar vs yugendra pawar baramati assembly constituency
बारामतीत अटीतटीचा सामना अजित पवार की युगेंद्र… मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवार यांच्या सभेची चर्चा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Maharashtra Live News
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : “नाशिकमध्ये आयटी पार्क आणेन”, राज ठाकरेंचं नाशिककरांना आवाहन!
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
Arguments over performance of MLA Prashant Thakur during this period
ठाकूरांच्या कामगिरीवरून वाद;पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाचे मुद्दे ऐरणीवर
Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024 : राज्यातल्या निवडणुका कोणत्या मुद्यांभोवती फिरत आहेत?
maharashtra vidhan sabha election 2024 pune assembly constituency bjp brahmin jodo
‘कसब्या’तील धड्यातून पुण्यात भाजपचे ‘ब्राह्मण जोडो’
Washim District, maha vikas aghadi, mahayuti
वाशीम जिल्ह्यात तिरंगी-चौरंगी सामने; जातीय समीकरण, मतविभाजन कुणाच्या पथ्यावर?

हेही वाचा >>> आम्ही पैसे लाटणारे नाही, तर जनतेचे पैसे जनतेला वाटणारे! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

जोगेश्वरी पूर्वच्या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवार मनीषा वायकर यांनी दिवसभरात चार ठिकाणी चौकसभा, एका ठिकाणी जनसंवाद, तर संध्याकाळी पदयात्रा यांचे आयोजन केले होते. दहिसरच्या भाजपच्या उमेदवार मनीषा चौधरी यांनी घरोघरी प्रचार दिला. बोरिवली येथील भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी मतदारसंघात प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. वांद्रे पश्चिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार असिफ झकारिय यांनी जनसंवादाचे आयोजन केले होते. लोकांच्या समस्या झकारिया यांनी यावेळी समजून घेतल्या. वरळीचे शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार आदित्य ठाकरे यांनी विभागात प्रचार फेरीचे आयोजन केले होते. रविवारी रस्ते मोकळे असल्यामुळे अनेक ठिकाणी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. माहीममध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी चाळी, गृहनिर्माण संकुल यांना भेटी दिली. भायखळामध्ये मनोज जामसुतकर यांनी पदयात्रेवर भर दिला होता. शाहूवाडी -पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील यांनी लोअर परळ येथील डिलाईल रोड येथे मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील रहिवाशांनी गावाकडे जाऊन आपले मतदान करावे असे आवाहन केले.