चंद्रपूर : क्रांतीभूमी चिमूर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया व काँग्रसचे डॉ. सतिश वारजूकर यांच्यात थेट लढत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले ३८ हजारांचे मताधिक्य व ‘अँटिइन्कम्बन्सी’मुळे भांगडिया यांच्या अडचणी वाढल्या आहेत. थेट लढत ही काँग्रेससाठी लाभदायी ठरणार, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. अशा परिस्थितीत भांगडिया विजयाची हॅट्ट्रीक करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेला चिमूर हा जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ आहे, जिथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व आमदार बंटी भांगडिया या दोघांशिवाय आजवर अन्य उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही. भांगडिया २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत येथून विजयी झाले. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर धनराज मुंगले आणि वंचित बहुजन आघाडीचे अरविंद सांदेकर यांच्यामुळे झालेल्या मतविभाजनाचा काँग्रेस उमेदवार डॉ. वारजूकर यांना फटका बसला होता. मात्र, यंदा परिस्थिती पूर्णत: बदलली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
MVA Rohit Patil vs Mahayuti Sanjay Patil One Vote Two MLA Campaign
Tasgaon Kavathe Mahankal Assembly Elections : ‘एक मत, दोन आमदार’ तासगाव – कवठेमहांकाळमध्ये वेगळाच प्रचार
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?

भांगडिया यांच्यसमोर आताही वारजूकर यांचेच आव्हान आहे. मात्र, २०१९ च्या तुलनेत आता वंचितचा जनाधार घटल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे, तर मुंगले यांनी माघार घेतल्यानेही काँग्रेसचे मतविभाजनही टळले आहे. भांगडिया यांनी मागील दहा वर्षांत रोजगार, आरोग्य विषयक सुविधा, शैक्षणिक प्रगती, या महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष केल्याचा मतप्रवाह मतदारसंघात आहे. माना समाजाचे नेते तथा माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे यांचा भाजपमधील प्रवेश भांगडिया यांच्यासाठी सकारात्मक असला तरी या भागात कुणबी, तेली व इतर समाजाची गठ्ठामते निर्णायक ठरतात.

हे ही वाचा… Tasgaon Kavathe Mahankal Assembly Elections : ‘एक मत, दोन आमदार’ तासगाव – कवठेमहांकाळमध्ये वेगळाच प्रचार

पंतप्रधान मोदी व राहुल गांधींची सभा

आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १२ नोव्हेंबर रोजी चिमूर येथे जाहीर सभा होणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची वारजूकर यांच्या प्रचारार्थ १६ नोव्हेंबर रोजी सभा नियोजित आहे. मोदी आणि राहुल गांधी यांच्या सभांचा या दोन्ही उमेदवारांना किती लाभ होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Story img Loader