ठाणे : सरकारच्या योजनेचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. कारण हे जनतेचे पैसे आहेत, असे सांगत आम्ही जनतेचे पैसे वाटणारे आहोत, त्यांचे पैसे लाटणारे नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात प्रचार रॅलीदरम्यान केली. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलोय. यामुळेच प्रत्येकाच्या घरात योजनेचा कसा लाभ मिळेल, याचा विचार करूनच योजना राबविल्या आहेत, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचाराकरिता रविवारी दुपारी वागळे इस्टेट भागात प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधताना विरोधकांवर टीका केली.

हेही वाचा >>> ‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर

आम्ही लाडकी बहीण योजनेतून महिलांना पैसे दिले तर, विरोधकांनी योजनेत खोडा घालण्याचे काम केले. त्यामुळे विरोधक मत मागायला येतील, तेव्हा त्यांना जोडा दाखवा. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात का गेलात, याची विचारणा करा. आमच्या परिवाराचा, मुलाबाळांच्या पोटचा घास का हिरावून घेत होता, याबाबतही विचारा. असे विचारल्यावर ते परत मत मागायला येणारच नाहीत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 cm eknath shinde slams opposition in campaign rally in thane print politics news zws