अमरावती : युवा स्‍वाभिमान पक्षाचे बडनेराचे आमदार रवी राणा यांना भाजपने पाठिंबा दिला आहे, पण दर्यापुरातून त्‍यांच्‍या पक्षाने महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्‍या उमेदवाराविरोधात मैदानात उडी घेतली आहे. भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष खासदार डॉ. अनिल बोंडे हे दर्यापुरात महायुतीचा प्रचार करीत आहेत, पण युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या फलकांवर डॉ. बोंडेंचे छायाचित्र झळकत आहे. मोर्शीमध्‍ये भाजप राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या (अजित पवार) विरोधात लढतीत आहे. या ठिकाणी महायुतीत मैत्रिपूर्ण लढत आहे. राजकारणातील या विरोधाभासामुळे मतदारही संभ्रमित झाले आहेत.

मोर्शी आणि दर्यापूर हे दोन्‍ही मतदारसंघ महायुतीसाठी अडचणीचे बनले आहेत. बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षाचे दोन उमेदवार रिंगणात आहेत, एक रवी राणा बडनेरामधून आणि दुसरे रमेश बुंदिले हे दर्यापुरातून लढत देत आहेत. रवी राणांना भाजपने पाठिंबा दिला असला, तरी दर्यापुरात मात्र बुंदिले यांना दिलेला नाही. तरीही रमेश बुंदिले यांच्‍या प्रचार पत्रके, फलकांवर भाजपचे खासदार आणि जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. अनिल बोंडे, भाजपच्‍या नेत्‍या आणि माजी खासदार नवनीत राणा यांची छायाचित्रे लावण्‍यात आली आहेत. डॉ. बोंडे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्‍याचा इशारा देऊनही त्‍यांचे छायाचित्र हटविण्‍यात आलेले नाही. महायुतीचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्‍यासाठी ही डोकेदुखी ठरली आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

नवनीत राणा या जिल्‍ह्यात भाजपच्‍या उमेदवाराचा प्रचार करीत असल्‍या, तरी दर्यापूरमध्‍ये त्‍या अभिजीत अडसूळ यांच्‍यासोबत नाहीत. अमरावतीत अद्याप राष्‍ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्‍या सुलभा खोडके यांच्‍या प्रचारासाठी देखील पुढे आलेल्‍या नाहीत. महायुतीतील ही फूट लक्षवेधी ठरली आहे.

नवनीत राणा यांनी अभिजीत अडसूळ यांच्‍या उमेदवारीला सुरूवातीपासूनच विरोध दर्शविला होता. लोकसभा निवडणुकीत अडसुळांनी विरोधात भूमिका घेतली, हा त्‍यांचा खरा आक्षेप. पण, महायुतीत ही जागा शिवसेना एकनाथ शिंदे गटाला सुटल्‍यानंतर नवनीत राणा यांनी दर्यापूरच्‍या बाबतीत घेतलेली वेगळी भूमिकाही चर्चेत आली.

हे ही वाचा… उमरेडमध्ये बौद्ध विरुद्ध हिंदू दलित मतांचे ध्रुवीकरण कोणाच्या पथ्यावर ?

मोर्शीत महायुतीत मैत्रिपूर्ण लढत होत आहे. रविवारी वरूड येथे भाजपचे उमेदवार उमेश यावलकर यांच्‍या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली. सभेला पोहचण्‍यासाठी उशीर झाल्‍याने शहा यांनी भाषण पाच मिनिटांमध्‍ये आटोपते घेतले, पण यावेळी त्‍यांना मोर्शी विधानसभा मतदारसंघात आम्हाला केवळ कमळ हवे, घड्याळ अजिबात नको, असे आवाहन करावे लागले.

हे ही वाचा… ‘मविआ’च्या उमेदवारांना काँग्रेसच्या बंडखोरीचा फटका बसणार!

राज्यात महायुती एकत्र निवडणुका लढत आहे. तर मोर्शी या मतदारसंघात भाजपकडून उमेश यावलकर तर राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार देवेंद्र भुयार हे रिंगणात आहेत. त्यामुळे येथे महायुतीत फूट पडली आहे. या राजकारणातील या विसंगतीमुळे मतदार देखील संभ्रमात सापडले आहेत.

Story img Loader