अमरावती : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला, तरी चार मतदारसंघांमध्ये मिळालेले मताधिक्य टिकवून ठेवण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांच्या विजयात अमरावती मतदारसंघाचा सिंहाचा वाटा राहिला होता. अमरावतीतून त्यांना तब्बल ४१ हजार ६४८ इतके भरघोस मताधिक्य मिळाले. त्यांचे गृहक्षेत्र दर्यापूर, तिवसा आणि अचलपूरमधूनही त्यांना साथ मिळाली होती. पण, बडनेरा आणि मेळघाट या दोन मतदारसंघांमध्ये ते पिछाडीवर राहिले.
जिल्ह्यातील मोर्शी आणि धामणगाव या दोन विधानसभा मतदारसंघांचा अंतर्भाव हा वर्धा लोकसभा मतदारसंघांमध्ये होतो. वर्ध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) खासदार अमर काळे यांना धामणगाव विधानसभा मतदारसंघातून १७ हजारांचे मताधिक्य मिळाले होते, तर मोर्शी मतदारसंघात ते १२ हजार मतांनी पिछाडीवर राहिले होते.
महाविकास आघाडीला आठपैकी पाच मतदारसंघांमध्ये मतदारांनी पसंती दिली. या कामगिरीची पुनरावृत्ती करून इतर मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळविण्यासाठी महाविकास आघाडीला धडपड करावी लागत आहे.
अमरावतीत गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या सुलभा खोडके यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातर्फे निवडणूक लढवित आहेत. गेल्या वेळी भाजपकडून रिंगणात असलेले डॉ. सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले आणि त्यांनी उमेदवारीही मिळवली. त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
हेही वाचा >>> ‘लाडक्या भावा’साठी खासदार बहिणीची राजकीय प्रतिष्ठा पणाला; वरोऱ्यात चुरशीची लढत
दर्यापूरमधून गेल्या निवडणुकीत बळवंत वानखडे हे काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले होते. ते खासदार झाल्यानंतर महाविकास आघाडीत दर्यापूरची जागा ही काँग्रेसला मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती, पण ही जागा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला मिळाली. या ठिकाणी बळवंत वानखडे यांना साडेआठ हजारांचे मताधिक्य मिळाले होते.
हेही वाचा >>> Sangli Vidhan Sabha Election 2024 : सागंलीत दादा घराणे पुन्हा ताकद दाखविणार ?
तिवसाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघात बळवंत वानखडे यांना १० हजार ५७६ इतके मताधिक्य मिळाल्याने यशोमती ठाकूर यांची आपले गृहक्षेत्रातील वर्चस्व सिद्ध केले. वानखडे यांना अचलपूरमधून ६ हजार ७९३ इतके मताधिक्य मिळाले होते. धामणगावातून अमर काळे यांना १७ हजारांचे मिळालेले मताधिक्य हे काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांच्यासाठी महत्वाचे ठरले. मात्र मेळघाट, बडनेरा आणि मोर्शी या तीन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला अपेक्षित जनाधार मिळू शकला नाही. या ठिकाणी महाविकास आघाडीला अधिक परिश्रम घ्यावे लागत आहेत. मेळघाटमधून भाजपच्या नवनीत राणा यांना मेळघाट मतदारसंघातून २१ हजार ५९५ आणि बडनेरामधून २६ हजार ७६३ इतके मताधिक्य मिळाले होते. मोर्शीतून भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना १२ हजारांची आघाडी मिळाली होती. मेळघाटमध्ये काँग्रेस, बडनेरात शिवसेना (उद्धव ठाकरे), तर मोर्शीत राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. तीनही उमेदवार नवखे आहेत. त्यांच्यासमोर भाजपची व्यूहरचना भेदण्याचे आव्हान आहे.