Deoli Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेत वर्धा जिल्हा १०० टक्के भाजपमय करण्याचा निर्धार पक्ष नेते गत दोन निवडणुकांपासून सोडून बसले आहे. मात्र काँग्रेसच्या रणजित कांबळे यांना ते तोड देवू शकले नसल्याने जिल्हा व वरिष्ठ भाजप नेते प्रामुख्याने देवळीत लक्ष ठेवून आहेत.
देवळी हा तसा प्रभा राव कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. पण येथील मतदारांनी दोनदा प्रभाताई राव यांचा पराभव करीत योग्य पर्याय असल्यास वेगळा विचार पण करू शकतो, असा संदेश दिला आहे. यावेळी आमदार कांबळे हे डबल हॅट ट्रिक साधण्याच्या तयारीत आहे. सलग पाच वेळा निवडून येतांना त्यांनी युतीच्या उमेदवारांचा पाडावं केला. फक्त एकदा त्यांना रामदास तडस यांच्याविरोधात कसाबसा निसटता विजय मिळाला होता. निवडणूकपूर्व महिन्याभरात कांबळे आपली सर्व ती आयुधे सज्ज ठेवतात. कसलीच कसर सोडत नसल्याचे त्यांच्याबाबत सांगितल्या जाते. जिल्ह्यात ते एकमेव असे काँग्रेस उमेदवार असतात ज्यांचा बूथ पातळीवर कार्यकर्ता दक्ष असतो. शिवाय कुणबी मतांचा मोठा हिस्सा त्यांच्याकडे जातो, असेही निरीक्षण आहे. मात्र निवडणूक झाली की कांबळे भेटेनासे होतात, हा आरोप त्यांच्यावर सातत्याने होत आला आहे. तसेच बोलण्यातील नको तेवढा स्पष्टपणा तसेच चढा सूर लोकांना नाराज करीत आल्याची प्रतिक्रिया असते. मतदारसंघात रस्ते, पाणी अश्या मूलभूत सोयीवर भर ते देतात. पण मतदारसंघ विशेष कामांनी ओळखल्या जाईल, असे कोणते काम त्यांनी सत्तेत असतांना केले, ते दाखवून द्या, असा विरोधक सवाल करीत असतात.
यावेळी भाजपने प्रदेश पदाधिकारी व पक्षात तडस विरोधी समजल्या जाणारे राजेश बकाने यांना उमेदवारी दिली आहे. गत निवडणुकीत ते अपक्ष उभे राहून युतीच्या उमेदवारास तिसऱ्या क्रमांकावर फेकत दुसऱ्या स्थानी आले होते. कामाला व पक्षकार्यात वाघ असणारे बकाने विजयी व्हावे म्हणून जिल्हाध्यक्ष गफाट व अन्य नेत्यांना ईथे तळ ठोकून थांबण्याचे आदेश आहेत. पण पक्षातच काही घरभेदी कांबळे ओढून घेतात, अशी चर्चा असल्याने पक्ष प्रभारी सुधीर दिवे दक्ष आहेत. आमदार कांबळे विरुद्ध बकाने या लढतीत अपक्ष किरण ठाकरे हे शेती प्रश्नावर लढणारे युवा नेते मैदानात आहेत. पण सामना सध्या कांबळे विरुद्ध बकाने असा रंगत चालला आहे.