चंद्रपूर : काँग्रेसमधील गटबाजी विधानसभा निवडणुकीतही कायमच आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष गटागटांत विखुरला आहे. मात्र, मोठ्या निवडणुकांमध्ये नेत्यांनी अंतर्गत गटबाजी विसरून एकदिलाने काम करावे, अशी पक्षश्रेष्ठींची भावना. मात्र, या भावनेला दरवेळीप्रमाणे यंदाही सुरुंग लावण्याचे काम नेत्यांनी केले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकमेकांच्या मतदारसंघांत प्रचारासाठी जाणे टाळत आहेत. नेत्यांमधील ही गटबाजी आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पसरली आहे. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सक्रिय प्रचारातून अंग काढून घेत आहेत.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्वतःच्या ब्रम्हपुरी मतदारसंघासोबत डॉ. सतीश वारजुरकर, बल्लारपूरमध्ये संतोष रावत आणि चंद्रपूर मतदारसंघात प्रवीण पडवेकर यांच्यासाठी प्रचारसभा व बैठका घेतल्या. मात्र, वरोरा व राजुरा मतदारसंघांत जाणे त्यांनी कटाक्षाने टाळले.

Congress Priyanka Gandhi road show today in West Nagpur and Gandhi Gate, Mahal in Central Nagpur
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Dhamangaon Constituency, Dhamangaon Constituency BJP Congress , Dhamangaon, Dhamangaon BJP news,
धामणगावात भाजप, काँग्रेसमध्‍ये वर्चस्‍वाची लढाई
Congress Priyanka Gandhi held road show in two constituencies in Nagpur on Sunday
प्रियंका गांधींचा आज नागपुरात या दोन ठिकाणी ‘रोड-शो’
BJP MLA Bharti Lovekar elected in Versova for two terms must work hard to win this year
वर्सोव्यात अल्पसंख्याक मतांवर भवितव्य, भाजपसाठी लढत कठीण
Sandeep Mali, Kalyan Rural Vice President of BJP,
भाजपचे कल्याण ग्रामीण उपाध्यक्ष संदीप माळी यांच्यावर तडीपारीची कारवाई
maharashtra vidhan sabha election 2024
विधानसभा निवडणुकीत चंद्रपुरात भाजपला गटबाजीचे ग्रहण
Meeting of Yogi Adityanath and Amit Shah in final stage of campaign in Nagpur
नागपुरात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दिग्गजांच्या सभा, कोण कोण येणार?

आणखी वाचा-सहा निवृत्त अधिकाऱ्यांना आमदारकीचे वेध

खासदार प्रतिभा धानोरकर वरोरा व राजुरा मतदारसंघांत सभा, बैठक घेत आहेत. चंद्रपुरात पडवेकर यांच्या एका बैठकीला त्यांनी हजेरी लावली. तसेच स्वतःच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. मात्र, येथे सक्रिय प्रचारापासून त्या दूरच आहेत. बल्लारपूर मतदारसंघात जाण्याचेही त्यांनी टाळले.

चंद्रपूर मतदारसंघात तर शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एन.एस.यू.आय., सेवादल या काँग्रेसच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय नसल्याचे चित्र आहे. अनेक पदाधिकारी त्यांच्या गटातील उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघांत जात आहेत. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे स्वतःच्याच प्रचारात अडकून पडले आहेत.

आणखी वाचा-बुलढाण्यात संजय गायकवाड यांच्यासमक्ष जयश्री शेळकेंचे तुल्यबळ आव्हान; कोण बाजी मारणार?

‘प्रचारात सहभागी व्हा’

वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील एक हॉटेलमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आपापल्या मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी व्हा, असे निर्देश त्यांनी दिले. यासाठी त्यांनी सर्वांना शपथही दिली. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे पदाधिकारी के.राजू यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी रस्त्यावर उतरून प्रचार करा, असे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले. मात्र, पदाधिकारी सक्रिय प्रचारापासून दूरच आहेत. काँग्रेसमधील गटबाजी एवढी खोलवर रुजली आहे की ती संपता संपत नसल्याचेच चित्र आहे.