चंद्रपूर : वरोरा विधानसभा मतदारसंघात धनोजे कुणबी समाजाचे पाच उमेदवार रिंगणात असल्याने मतविभाजन अटळ मानले जात आहे. काँग्रेस उमेदवार ‘लाडके भाऊ’ प्रवीण काकडे यांच्यासाठी खासदार बहीण प्रतिभा धानोरकर यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसरीकडे भासरे अनिल धानोरकर यांच्यामुळे खासदार धानोरकर यांची राजकीय गणिते बिघडतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

वरोरा हा कुणबीबहुल मतदार संघ. येथे खैरे कुणबी समाजाचे मतदार सर्वाधिक. त्या पाठोपाठ धनोजे कुणबी समाजाचे मतदार आहेत. खैरे कुणबी समाजातून भाजपचे करण देवतळे हे एकमेव उमेदवार आहेत, तर धनोजे कुणबी समाजाचे काँग्रेसचे काकडे, अपक्ष डॉ. चेतन खुटेमाटे, महाविकास आघाडीचे बंडखोर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, वंचितचे अनिल धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे भाजपचे मतविभाजन कमी, तर काँग्रेसचे मतविभाजन अधिक होण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेसची पारंपरिक मुस्लीम समाजाची गठ्ठा मते प्रहारचे उमेदवार अहेतेशाम अली कमी करीतील, असे दिसते.

Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Vishal Patil Jayashree Patil in Sangli Assembly Constituency Election 2024
Sangli Vidhan Sabha Election 2024 : सागंलीत दादा घराणे पुन्हा ताकद दाखविणार ?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा >>> Chhatrapati Sambhajinagar Assembly Constituency: जरांगे यांच्या ‘मराठा- मुस्लिम व दलित’ मतपेढीसाठी ओवेसी  यांची सहमती

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर १० हजार मतांच्या आघाडीने विजयी झाल्या होत्या. त्यांच्या विजयात दिवं. बाळू धानोरकर यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच भद्रावती शहर तथा तालुक्यातून धानोरकर यांना मताधिक्य मिळाले होते. मात्र, आता २०१९ सारखी परिस्थिती नाही. भद्रावती येथून स्वतः त्यांचे भासरे व माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर रिंगणात आहेत. त्यामुळे भद्रावतीत त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

खासदार धानोरकर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत २ लाख ६० हजार मतांनी जिंकल्या. मात्र मागील सहा महिन्यांत राजकीय परिस्थितीत बराच बदल झाला. त्याचाही फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> निवडणूक उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निर्णय योग्यच; आयोगाचा उच्च न्यायालयात दावा, याचिका फेटाळली

काकडे हे मतदारांच्या मनातील उमेदवार नाहीत, ते केवळ बहीण खासदार धानोरकर यांच्या मनातील उमेदवार आहेत, असा मतप्रवाह मतदारसंघात आहे. काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यातही नाराजीची भावना आहे. काकडे यांच्या उमेदवारीने धानोरकर कुटुंबात उभी फुट पडली आहे. एकीकडे खासदार धानोरकर एकट्या आहेत, तर दुसरीकडे भासरे अनिल धानोरकर, सासू व इतर नातेवाईक आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे दुसरे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे हे उमेदवारी दाखल करताना प्रवीण काकडे यांच्या सोबत होते. मात्र, शिंदे व अनिल धानोरकर यांच्यातील सख्य सर्वश्रुत आहे. एकंदरीत राजकीय परिस्थिती बघता वरोरा मतदारसंघात चुरशीची लढत रंगणार, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.