नागपूर : पूर्व विदर्भात लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुन पराभव झाला असला तरी विधानसभा निवडणुकीत या भागात बहूतांश जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री, दोन प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि वरिष्ठ मंत्री रिंगणात असल्याने पूर्व विदर्भातील या पाच प्रमुख लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा यंदाची महाराष्ट्रातील निवडणूक वेगळी आहे. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोन प्रमुख पक्षांमध्ये फुट पडल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सहा पक्षांमध्ये महाराष्ट्रात थेट लढती होणार आहेत. त्यात पूर्व विदर्भात होणारी लढत ही सर्वांसाठी लक्षवेधी ठरणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दक्षिण-पश्चिम नागपूर मतदासंघातून चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर कामठी विधानसभेतून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, साकोली विधानसभेतून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ब्रह्मपुरी विधानसभेतून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बल्लारपूर विधानसभेतून वनमंत्री व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार निवडणूक रिंगणात आहेत. या प्रमुख लढतींकडे महाराष्ट्रांचे लक्ष लागले आहे.

Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
thane assembly constituency sanjay kelkars strength with candidature of ubt rajan vichare for maharashtra vidhan sabha election 2024
Thane Vidhan Sabha Constituency : राजन विचारेंच्या उमेदवारीने ठाण्यात संजय केळकर यांना बळ
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra assembly election 2024 BJP rebel Dadarao Keche moved out of Maharashtra
आर्वीत राजकीय भूकंप, भाजप बंडखोर दादाराव केचे यांना महाराष्ट्राबाहेर हलविले

आणखी वाचा-Buldhana Vidhan Sabha Constituency : सातत्य राखण्याचे युतीपुढे तर कामगिरी उंचावण्याचे आघाडीसमोर आव्हान!

विदर्भातील एकूण ६२ विधानसभा मतदारसंघात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १२ मतदारसंघ आहेत. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात ८, बुलढाणा जिल्ह्यात ७, यवतमाळ जिल्ह्यात ७, चंद्रपूर जिल्ह्यात ६, अकोला जिल्ह्यात ५, वर्धा जिल्ह्यात ४, गोंदिया जिल्ह्यात ४, भंडारा जिल्ह्यात ३, वाशिम जिल्ह्यात ३ आणि गडचिरोली जिल्ह्यात ३ विधानसभा मतदारसंघ आहेत.

फडणवीस सहाव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात

राज्याचे लक्ष दक्षिण-प्रश्चिम नागपूरच्या निवडणुकीकडे लागले आहे. मागील पाच निवडणुकीत निवडून आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा या मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. १९९९ ते २००४ पर्यंत दोनदा पश्चिम नागपूर आणि मतदारसंघाच्या पुर्नरचनेनंतर २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये तीनदा अशी पाचदा निवडणूक लढवली आहे. १९९९ मध्ये फडणवीस यांनी काँग्रेसचे अशोक धवड, २००४ मध्ये रणजीत देशमुख, २००९ मध्ये विकास ठाकरे, २०१४ मध्ये प्रफुल्ल गुडधे आणि २०१९ मध्ये आशीष देशमुख यांना पराभूत केले होते. यावर्षी पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांच्यासोबत थेट लढत होणार आहे.

आणखी वाचा-Raj Thackeray : राज ठाकरेंसमोर दुहेरी आव्हान; अमित ठाकरे विधानसभेत गेल्यामुळं मनसेचं पुनरुज्जीवन होणार?

नाना पटोलेंसमोर भाजपसह अपक्षांचे आव्हान

२०१९ ला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्ष पद देण्यात आले. त्यानंतर या पदाचा राजीनामा देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. २०१९ मध्ये पटोले यांनी भाजपचे परिणय फुके यांचा सहा हजारांवर मतांनी पराभूत केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा साकोली मतदारसंघातून नाना पटोले निवडणुकीला समोर जात आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांचे आव्हान आहे. २०१९ ला कमी मताधिक्य असल्याने पटोलेंसमोर मोठे आव्हान आहे. तसेच भाजपने विविध समाजाचे अपक्ष उमेदवारही दिले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा रिंगणात

कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४ ते २०१४ पर्यंत तीनदा सलग निवडून येणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा एकदा या मतदसंघातून रिंगणात उतरले आहेत. दलित आणि मुस्लीम बहूल असणाऱ्या या मतदारसंघातून कायम निवडून येणाऱ्या बावनकुळेंना भाजपने २०१९ मध्ये उमेदवारी नाकारली होती. यावेळी भाजपचे टेकचंद सावरकर यांनी काँग्रेसच्या सुरेश भोयर यांचा पराभव केला होता. बावनकुळे यांच्याकडे आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद असून ते स्वत: कामठी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांची थेट लढत ही काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्यासोबत होणार आहे.

आणखी वाचा-Raigad Vidhan Sabha Constituency : रायगडमध्ये महायुती, महाविकास आघाडीतील तिढा कायम; परस्परांच्या विरोधात उमेदवार

वडेट्टीवारांची भाजपसोबत थेट लढत

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पुन्हा एकदा ब्रह्मपुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. २००४ मध्ये पहिल्यांदा त्यांनी शिवसेनेकडून चिमूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पुन्हा एकदा चिमूर मतदारसंघातून निवडणूक लढवली व जिंकली. मात्र, २०१४ पासून त्यांनी आपला मतदारसंघ बदलवत ब्रह्मपुरीमधून दोनदा निवडणूक लढवली आहे. यावेळी भाजपचे कृष्णलाल सहारे यांच्यासोबत त्यांची थेट लढत होणार आहे.

बल्लारपूरमधून मुनगंटीवार पुन्हा रिंगणात

भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा बल्लारपूर मतदारसंघातून निवडणुकीला समोर जाणार आहेत. त्यांनी १९९९, २००४ असे दोनदा चंद्रपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. मतदारसंघाच्या पुर्नरचनेनंतर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने मुनगंटीवार यांनी २००९ ते २०१९ पासून बल्लापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला. यावर्षी त्यांची थेट लढत ही काँग्रेसचे संतोष सिंह रावत यांच्यासोबत होणार आहे.

Story img Loader