वर्धा: माजी आमदार राजू तिमांडे यांची रिंगनातील हजेरी हिंगणघाट मतदारसंघात निर्णयक ठरण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात महाआघाडीस २१ हजारपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. त्यामुळे युती सावध झाली आहे. महायुतीचे विद्यमान आमदार समीर कुणावार यांची थेट लढत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अतुल वांदिले यांच्याशी असून वांदिले यांना तिकीट दिल्याने नाराज कोठारी – तिमांडे गट पक्षातून बाहेर पडला. नेत्यांचे आदेश धुडकावून तिमांडे यांनी बंडखोरी केल्याने खुद्द शरद पवार यांनी येथे हजेरी लावत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तो फोल ठरला. पण मुख्य लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच असून निष्ठावंत गट काय काय ताकद दाखविणार, हा कळीचा मुद्दा आहे. मात्र तिमांडे यांची उमेदवारी ही कुणाच्या तरी ‘ आशीर्वादातून ‘ आल्याची कुजबुज मोठ्या प्रमाणात आहे. हिंगणघाटमधील पवार समर्थक’ ही महत्वाची भूमिका पार पाडत आहे. आघाडीचे वांदिले यांना सरकारविरोधी हवा असल्याने त्यांचा विजय सोपा वाटतो. तेली समाजाची मते एकतर्फी मलाच पडतील, असा टोला ते तिमांडे यांच्या उमेदवाऱीवर लगवतात. तर भाजपचे समीर कुणावार हे त्यांच्या सभाना मिळणारा प्रतिसाद दाखवून सत्ताधाऱ्यांविरोधात काहीच नाराजी नसल्याचे स्पष्ट करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मतदारसंघात कामगार, मजूर, दलित लक्षनीय संख्येत स्थान राखून आहेत. युतीतील सेना व आघाडीतील काँग्रेस येथे गलीतगात्र असल्याची स्थिती आहे. दोन्ही उमेदवार या मित्रांना गणतीत पण घेत नसल्याने हे थंड बसून असल्याचे दिसून येते. अतुल वांदिले हे पक्षात नवखे पण त्यांनी दोनच वर्षात स्वतः केलेल्या आंदोलनांनी स्थान अधोरेखित केले आहे. हिंगणघाटकर मतदार काय करतील याचा नेम नसल्याचे शरद जोशी यांच्या पराभव झाल्याने सातत्याने म्हटले जात असते. कुणावार याच चर्चेमुळे सतर्क असून बेसावध राहून निवडणूक जिंकणे शक्य नसल्याने त्यांनी सर्व ते कौशल्य पणास लावले आहे. त्यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले वांदिले तसेच अपक्ष तिमांडे यात कोण वरचढ, हे पुढेच दिसणार. पण लढाई आपल्याभोवती फिरत ठेवण्यास त्यांनी मात्र आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : चंद्रपूर मतदारसंघात दलित, मुस्लीम व ओबीसी ‘फॅक्टर’ महत्त्वाचा

काँग्रेस विरोधकांचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख निर्माण झाली आहे. १९८० नंतर एकदाच पाच वेळा लढणारे राष्ट्रवादीचे राजू तिमांडे हे काँग्रेसी विजयी होवू शकले. तीन वेळा आमदार राहलेले अशोक शिंदे आता ठाकरे गटात म्हणजे आघाडीत आले आहे. पण अंतिम टप्प्यात त्यांची उपस्थिती कामाची राहणार नसल्याची चर्चा होते. म्हणून महायुती विरुद्ध महाआघाडी असेच ठळक चित्र आहे.