हिंगोली : विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या नाराज इच्छुकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी मनधरणी सुरू असून त्यासाठी हैदराबाद येथील आमदार राम मोहन रेड्डी हे पक्षनिरीक्षक गुरुवारी हिंगोलीत आले दाखल झाले होते. त्यांनी नाराज व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नेत्यांची भेट घेतली. मात्र, काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकरांनी पक्षनिरिक्षक येत असल्याचे कळवताच ‘आपल्याकडे येण्याची काहीही गरज नाही. आपण अपक्ष लढवण्यावर ठाम आहोत’ असे सांगत रेड्डी यांची भेट घेण्यास नकार दिला. गोरेगावकरांचा नकार ऐकून पक्ष निरीक्षकांना परतावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Naigaon Assembly Constituency : जुन्या भागीदारांचे राजकीय वारस आमने-सामने !

हिंगोली मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांचे मन वळविण्यासाठी पक्ष निरीक्षक राम मोहन रेड्डी, आमदार प्रज्ञा सातव, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई हिंगोली शहरात दाखल झाले होते. जिल्हयात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. विशेष म्हणजे हिंगोलीची हक्काची जागा काँग्रेसने ठाकरे गटाला सोडल्याने काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह चांगलाच चव्हाट्यावर आला. गेल्या चार वर्षापासून माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती.

मात्र, जागाच सुटली नसल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यामधून तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. हिंगोलीची जागा लढविण्यासाठी माजी आमदार गोरेगावकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच माजी नगराध्यक्ष सुधीर सराफ, माजी जि. प. सदस्य श्यामराव जगताप यांनीही अर्ज दाखल केला आहे. तर चौथे इच्छुक प्रकाश थोरात यांनी मात्र अखेरच्याक्षणी वंचित बहुजनआघाडीचा आधार घेत उमेदवारी अर्ज दाखल केली. यातील सुधीरप्पा सराफ, श्यामराव जगताप, वसमतचे डॉ. क्यातमवार यांची रेड्डी यांनी भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांची बाजू ऐकून घेतली. दरम्यान, सराफ यांनी त्यांना कसलाही शब्द न देता कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतलेल्या निर्णयाची माहिती देणार असल्याचे उत्तर दिले. यावेळी आमदार प्रज्ञा सातव, जिल्हाध्यक्ष दिलीप देसाईंसह इतरही पदाधिकारी उपस्थित होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 hingoli assembly constituency ex mla bhau patil goregaonkar refuse to meet congress observers mla ram mohan reddy print politics news zws