अकोला : अकोट विधानसभा मतदारसंघात भाजपपुढे काँग्रेसचे तगडे आव्हान आहे. वंचित आघाडी देखील रिंगणात असून गठ्ठा मतदार लक्षात घेत पक्षांनी उमेदवार दिले. जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर पडणार, यावर मतदारसंघातील समीकरण जुळून येण्याची चिन्हे आहेत.

अकोट मतदारसंघ २०१४ पासून भाजपच्या ताब्यात आहे. दर्यापूरचे प्रकाश भारसाकळे प्रतिनिधित्व करतात. अकोटमधून लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी असतांना भाजपने पुन्हा एकदा भारसाकळेंवर विश्वास दाखवला. २०१९ मध्ये बहुरंगी लढतीत सात हजार १६० मतांनी भाजपने मतदारसंघ राखला होता. पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मतदारसंघातील समीकरणात व्यापक फेरबदल झाला. लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास २०१९ मध्ये अकोट मतदारसंघात संजय धोत्रेंनी ५२ हजार २११ मतांनी मताधिक्य घेतले होते, यावेळेस अनुप धोत्रेंना नऊ हजार १६८ मतांची आघाडी मिळाली. घटलेले मताधिक्य प्रकाश भारसाकळेंसाठी चिंताजनक ठरू शकते. गेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवारांमुळे समाजाचे मतविभाजन झाले होते. यावेळेस मराठा समाजाची गठ्ठा मतपेढी आपल्या पारड्यात पडेल, असे भाजपने गृहीत धरले आहे. तिसऱ्या आघाडीकडून शेतकरी संघटनचे ललित बहाळे निवडणूक लढत असल्याचे काही प्रमाणात मराठा समाजाची मते विभाजित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकाश भारसाकळेंसाठी मतदारसंघात अद्याप कुठल्याही मोठ्या नेत्याची सभा झालेली नाही. भेटीगाठीवर त्यांच्या प्रचाराचा जोर आहे.

present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !

अकोटमध्ये काँग्रेसने गणगणे परिवारावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. ॲड. महेश गणगणेंना अकोटमधून काँग्रेसने दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरवले. गणगणे कुटुंबात काँग्रेसने सातव्यांदा तिकीट दिले आहे. अकोट मतदारसंघात गठ्ठा मतदार लक्षात घेता माळी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले. राजकीय समीकरणावर त्याचा मोठा प्रभाव पडण्याचा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला तोडीस-तोड लढत देत अकोटमधून काँग्रेसने ६९ हजार ०६० मते मिळवली. २०१४ मध्ये काँग्रेसने स्वबळावर लढत ॲड. महेश गणगणेंनी ३८ हजारावर मते घेतली होती. आता प्रकाश भारसाकळे व ॲड. महेश गणगणे यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. ही निवडणूक गणगणे परिवाराने प्रतिष्ठेची केली असून माजी मंत्री, ओबीसी नेते सुधाकरराव गणगणे हे देखील प्रचारात उतरले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अकोटमध्ये सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. वंचित आघाडीने बारी समाजाचे दीपक बोडके यांना संधी दिली. यावरून पक्षाच्या परंपरागत मतपेढीत मतभिन्नता आहे. गेल्या वेळेस वंचित दुसऱ्या क्रमांकावर होती. अकोट मतदारसंघात मराठा, कुणबी, माळी, बारी, मुस्लीम, दलितांसह विविध समाजाच्या गठ्ठा मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

हे ही वाचा… मोदींच्या सभेचा महायुतीच्या उमेदवारांना फायदा होणार का?

जातीय राजकारणांत प्रश्न, समस्या मागे

जातीय राजकारणात अकोट मतदारसंघातील समस्या, प्रश्न मागे पडल्याचे चित्र आहे. कोट्यवधींचा निधी आणल्याचा दावा केला जात असला तरी मतदारसंघाचा अपेक्षित विकास झाला नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांनी घेरले आहे.