चंद्रपूर : अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदारसंघात दलित, मुस्लीम व ओबीसी मतदार हा महत्त्वाचा ‘फॅक्टर’ आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी उभा असलेला हा मतदार विधानसभा निवडणुकीत कोणाला कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चंद्रपूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र १९९५ पासून येथे भाजपचे वर्चस्व आहे. पाच वर्षांपूर्वी २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष किशोर जोरगेवार ७२ हजारपेक्षा अधिक मतांनी निवडून आले. त्यांनी भाजपचे नाना शामकुळे यांचा पराभव केला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथे काँग्रेसला ५७ हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली. यात दलित, मुस्लीम व ओबीसी समाजाची गठ्ठा मते आहेत. ही विक्रमी मतांची आघाडी काँग्रेससाठी विधानसभा निवडणुकीतही फायद्याची ठरेल, आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

marathi actor atul kulkarni
वेडी आशा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Kiren Rijiju criticized pm modi said PM Modi targets Congress
मोदींनी संसदेला ओलीस ठेवले होते…काँग्रेस प्रवक्त्याच्या आरोपाने…
Kanhaiya kumar
“अमित शाह यांनी महाराष्ट्र अदानीला विकला”, कन्हैया कुमार गरजले, “कमळाचे फूल उगवले अन् दहशत, गुंडागर्दीचे पीक…”
navneet rana
अमरावती जिल्‍ह्यात उपद्रवमूल्‍य वाढविणारा प्रयोग
maharashtra vidhan sabha election 2024
विधानसभा निवडणुकीत चंद्रपुरात भाजपला गटबाजीचे ग्रहण
Baramati Assembly Constituency Assembly Election 2024 Ajit Pawar Yugendra Pawar print politics news
लक्षवेधी लढत: बारामती : बारामती कोणत्या पवारांची?
shweta mahale vs congress rahul bondre
चिखलीत ‘ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार?

हेही वाचा : तुमसर विधानसभेत जात, पक्ष अन् चिन्ह दुय्यम स्थानी; उमेदवारच केंद्रस्थानी !

या मतदारसंघात दलित, मुस्लीम, ओबीसी मतदार संख्येने अधिक आहेत. दलित व मुस्लीम मतदार नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे, तर मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे ओबीसी मतदार भाजपपासून दुरावल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत ही नाराजी मतदानातून दिसून आली. ओबीसींमध्ये कुणबी हा सर्वात मोठा समाज आहे. हा समाज भाजपवर नाराज आहे. त्यातही वणी येथे भाजप कार्यकर्त्याने कुणबी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यात अधिक भर पडली आहे. शहरात माळी समाजही बहुसंख्येने आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत शाम वानखेडे यांच्यामुळे हा समाज काँग्रेससोबत आहे. मात्र, मागील काही निवडणुकीत हा समाज भाजपकडे वळल्याचेही दिसून आले. तेली समाज भाजपसोबत असून ओबीसींमधील इतर लहान समाज काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांसोबत आहे.

भाजप उमेदवार किशोर जोरगेवार हिंदू दलीत आहेत. ते बुरड समाजातून येतात, तर काँग्रेसचे प्रवीण पडवेकर आणि भाजप बंडखोर ब्रिजभूषण पाझारे बौद्ध समाजातील आहेत. सातत्याने पक्ष बदल करून विश्वासार्हता गमावलेले काँग्रेस बंडखोर राजू झोडे चंद्रपूर मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत. झोडे यांना काँग्रेसच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असून सर्व प्रकारची मदत त्यांच्याकडून केली जात आहे. मात्र, झोडे वंचित बहुजन आघाडी तथा इतर पक्ष फिरून आल्याने स्थानिक मतदार त्यांना स्वीकारतील का, हा प्रश्नच आहे. भाजप बंडखोर पाझारे यांना विविध पातळीवरून मागील दरवाज्याने वेगवेगळी मदत होत आहे. ही मदत सर्व प्रकारची आहे.

हेही वाचा : Nagpur Assembly Election 2024: भाजप स्टार प्रचारकांच्या सभा फक्त पक्षाच्या उमेदवारांसाठीच, महायुतीतील घटक पक्षाकडे दुर्लक्ष

जोरगेवार विकासाचा मुद्दा घेऊन मतदारांसमोर जात आहे. मात्र, मागील काही वर्षांत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाआघाडी, महायुती अशी निष्ठा बदलत राहिल्याने त्यांच्याप्रती मतदारांमध्ये सुप्त नाराजी आहे. काँग्रेसचे पडवेकर गरीब कुटुंबातील सामान्य उमेदवार, अशी गळ मतदारांना घालत आहे. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. याला काँग्रेसच्याच स्थानिक लोकप्रतिनिधींची फुस आहे.

हेही वाचा : Gondia Assembly Election 2024 : गोंदियातील राहुल गांधींची सभा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तारणार?

एकंदरीत, या निवडणुकीत दलित, मुस्लीम व ओबीसी समाजाची मते निर्णायक ठरणार असून ती जोरगेवार, पडवेकर व पाझारे यांच्यापैकी कोणाच्या पारड्यात जातात, यावरच जय-पराजय अवलंबून असेल.