कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने दणदणीत यश मिळवले असताना एकही जागा मिळू न शकलेल्या महाविकास आघाडी समोरील आव्हान अधिकच वाढीस लागले आहे. महाविकास आघाडीला जिल्ह्यातील राजकारणात नव्याने स्थान निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अस्तित्व दाखवताना आघाडीच्या नेत्यांचा कस लागणार आहे.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!

विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल कोल्हापुरातही महायुतीला उभारी देणारा असताना महाविकास आघाडीचे पारंपरिक किल्ले धडाधड कोसळले. अशा बिकट परिस्थितीत राजकीय वाटचाल करणे हे जिल्ह्यातील मविआ समोर खडतर आव्हान असणार आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनते सतेज पाटील यांच्याकडे मविआच्या प्रचाराची धुरा होती. त्यांनी सर्व दहा मतदारसंघांत समन्वय ठेवतानाच आवश्यक ती रसदही पुरवली होती. इतके करूनही कोल्हापूर उत्तर – दक्षिण या हक्काच्या मतदारसंघासह अन्य आठ ठिकाणी आघाडीचा बोजवारा उडाला. त्यामुळे आमदार पाटील हे किती ताकतीने पाय रोवून उभे राहतात यावर आघाडीतील अन्य सुभेदारांमधील लढण्याचे राजकीय धैर्य दिसून येणार आहे.

हेही वाचा – राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चा ; प्रकाश महाजन, संजय राऊत यांची सूचक वक्तव्ये

आगामी वर्ष कसोटीचे

विरोधकांसाठी उगवते वर्ष हे त्यांच्या नेतृत्वाचा संयम पाहणारे असणार आहे. नजीकच्या काळामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या यशाने महायुतीला कमालीचा आत्मविश्वास मिळालेला आहे. त्यांच्याकडे चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजय मंडलिक, राजेश क्षीरसागर, विनय कोरे, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासारख्या तगड्या नेत्यांची फौज असणार आहे. त्यांच्याशी मुकाबला करताना सतेज पाटील यांना एकाकी – एकहाती लढत द्यावी लागणार आहे. ते विधान परिषदेत निवडून जातात. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्यांचे मतदान याचा निर्णय घेत असतात. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती – मविआ यांना कसे, किती प्रमाणात यश मिळणार यावर पाटील यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना या पक्षातील नेत्यांची कितपत साथ मिळते यावर राजकीय वाटचाल अवलंबून असणार आहे.

नव्या उमेदवारांचा शोध

विधानसभा निवडणुकीमध्ये मविआचे के. पी. पाटील, गणपतराव पाटील, सत्यजित पाटील सरूडकर तीन उमेदवार वरिष्ठ गटातील राहिले. त्यांनी चांगली लढत दिली असली तरी यावेळच्या आणि आधीच्या निवडणुकांचा अनुभव लक्षात घेऊन ते पुन्हा नव्याने राजनीतीचे द्वंद्व करण्यासाठी कितपत जोमाने सज्ज असणार हेही पाहावे लागणार आहे. वय हा त्यातील महत्त्वाचा घटक ठरणार आहे. समरजित घाटगे यांनी लढण्यासाठी आतापासून सज्ज असल्याचे सांगितले आहे. हा एक अपवाद दिसतो. ऋतुराज पाटील, राजू आवळे, मदन कारंडे, राजू आवळे यांच्यात लढण्याची ऊर्जा, उर्मी तयार करावी लागेल. निराशेचे सावट असलेली परिस्थिती पाहता मविआ कितपत उभारी घेणार हाच खरा मुद्दा आहे.

हेही वाचा – १५ वी विधानसभा अस्तित्वात; नवनिर्वाचित सदस्यांची यादी राज्यपालांकडे सूपूर्द

आव्हानांना सामोरे जाणे ही सतेज पाटील यांची खासियत मानली जाते. महाविकास आघाडी जिल्ह्यात नव्याने उभारी घेईल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. ‘राज्यात आणि जिल्ह्यात आघाडीची पीछेहाट झाली आहे. राजकारणाची दिशा बदलली आहे. त्याचा विचार केला जाईल. पराभवामुळे कार्यकर्ते खचणार नाहीत. दोन पावले मागे आलो असलो तरी भविष्यात निश्चितच पुढे जाऊ. आघाडीला पुन्हा चांगले दिवस येतील,’ अशा शब्दांत सतेज पाटील यांनी भिडण्यासाठी तत्पर असल्याचा सांगावा दिला आहे.

Story img Loader