लातूर – लोकसभा निवडणुकीत भाजपवर कुरघोडी करण्यासाठी काँग्रेसने लिंगायत मताचे ध्रुवीकरण करण्याची खेळी केली. ती यशस्वी झाली. काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे प्रचंड मतांनी विजयी झाले. विधानसभेत भाजपने लिंगायत मताच्या ध्रुवीकरणाचा डाव काँग्रेसवर टाकत संपूर्ण जिल्हाभर लिंगायत मताचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी कर्नाटकातील खासदार भगवंत खुब्बा यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. अर्चना पाटील चाकुरकर विजयी होण्यावर या प्रयत्नांचे यश- अपयश ठरणार आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपने शिवराज पाटील चाकुरकरांची स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मंगळवारी रात्री शहरातील हनुमान चौकात त्यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत कर्नाटकचे बिदर येथील माजी मंत्री व खासदार भगवंत खुब्बा, शिवराज पाटील चाकूरकरांचे समर्थक बसवराज पाटील मुरूमकर, आमदार संभाजी पाटील निलंगेकर व आमदार अभिमन्यू पवार यांनी चाकुरकरांची स्तुती केली आणि देशमुखांवर टीका केली.

maharashtra assembly election 2024 , manoj jarange,
आरक्षणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या घनसावंगीमध्ये मनोज जरांगे कोणाच्या बाजूने ?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Raj Thackeray
Raj Thackeray : “माझा मुलगा रुग्णालयात असताना हा माणूस विकला गेला”, राज ठाकरेंकडून सात वर्षांनी मनातली खदखद व्यक्त
Justice Chandiwal Said This Thing About Devendra Fadnavis
Justice Chandiwal : “सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न केला, मी..”, जस्टिस चांदिवाल यांचा खुलासा
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
maharashtra assembly election 2024, raosaheb danve,
रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा – विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी

लातूर जिल्ह्यात देशमुख- चाकूरकर असा वाद पूर्वापार चालत आला आहे. त्याचा लाभ विधानसभा निवडणुकीत उचलला जातो आहे. जिल्ह्यातील लातूर शहराबरोबर औसा व निलंगा या दोन मतदारसंघात लिंगायत समाजाची संख्या अतिशय मोठी आहे. निलंगा व औसा मतदारसंघात लाडकी बहीण हा प्रचाराचा मुद्दा आहेच. पण लिंगायत मतांना साद घातली जात आहे. शिवराज पाटील चाकुरकर यांना लिंगायत समाजाचे नेते म्हणून मान्यता आहे. त्यामुळेच बसवराज पाटील मुरूमकर यांनी अर्चना पाटील यांना मत म्हणजे शिवराज पाटील यांना मत असे आवाहन करण्यात आले.

हेही वाचा – गोंदियात गोपालदास अग्रवाल विरुद्ध विनोद अग्रवाल यांच्यात लक्षवेधी लढत, तिसऱ्यांदा समोरासमोर

भगवंत खुब्बा हेही लिंगायत समाजाचे नेते मानले जातात. कर्नाटकाशी जोडलेला लिंगायत समाज कानडी भाषिकही आहे. त्यामुळे कर्नाटकातील नेत्यांना बोलावून त्यांच्या सभा भाजपाने आयोजित केल्या आहेत. याच सभेत अर्चना पाटील यांच्या विजयासाठी आवाहन करताना अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील निलंगेकर यांनी हजेरी लावली. त्यांनीही त्यांच्या भाागातील लिंगायत मतांना पुन्हा साद घातली. त्यामुळे काँग्रेसकडे सरकलेली लिंगायत मतपेढी पुन्हा आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी भाजपा कामाला लागली आहे.