नागपूर : नागपुरात संघाचे मुख्यालय असल्याने पुरोगामी विचारांच्या संघटना, राजकीय पक्ष त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी या शहराची निवड करतात. महात्मा गांधी यांच्या हत्त्या घडवून आणण्यात संघाचा हात होता, असे नेहमीच आरोप होत असतात. ते फेटाळलेही जातात. निवडणुका आल्यावर त्याला पुन्हा उजळणी दिली जाते. पक्ष जर काँग्रेस असेल तर ओघाने ते आलेच. तेच नेमके या विधानसभा निवडणुकीच्या काळात घडले. नागपुरात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे वेगवेगळे कार्यक्रम झाले. त्याचा किती फायदा विधानसभा निवडणुकीत पक्षाला किती झाला याची चर्चा आता सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर शहरात विधानसभेच्या सहा जागा आहेत. यात नावीन्य काहीच नाही, प्रत्येक शहरात काही ना काही जागा असतात. पण नागपूरचे वेगळेपण अनेक बाबतीत आहे. येथे जसे राष्ट्रयी स्वंयसेवक संघांचे मुख्यालय आहे तसेच रक्ताचा ऐक थेंब न सांडवता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणलेली धम्मक्रांतीचे ज्या ठिकाणी ही क्रांती घडली त्या दीक्षाभूमीचेही शहरही नागपूरच आहे. त्यामुळे उजव्या आणि पुरोगामी विचारांचा तेवढाच प्रभाव या शहरावर आहे. रिपल्बिकन चळवळीचे शहर अशी ओळखही या शहराची आहे. त्यामुळे या शहरात विधानसभेच्या किती जागा याचा उल्लेख येतो. नागपूरमधून कधीकाळी सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा मान काँग्रेसकडे होता. काँगेसने दगडाला उमेदवारी द्यावी तो निवडून यावा, असे चक्र अनेक वर्ष चालले. भाजपने याच नीतीचा अवलंब करीत काँग्रेसला या शहरात रोखण्याचा प्रयत्न केला. पणअद्यापही सहापैकी सहा जागा भाजपला जिंकता आल्या नाही. मागच्या निवडणुकीत सहा पैकी चार भाजप व दोन काँग्रेस असे चित्र होते व या निवडणुकीतही ते कायम राहिले. विषय आहे तो या निवडणुकीत नागपूरमध्ये झालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या दौऱ्याचा काँग्रेसला झालेल्या फायद्याचा.

हेही वाचा >>>गडचिरोलीत एक दशकानंतर काँग्रेसला संधी, आरमोरीची जागा गमावल्याने भाजपला धक्का

राहुल गांधी यांचा नागपूर दौरा

निवडणुकापूर्वी नागपुरात झालेल्या संविधान सन्मान संमेलनाच्या निमित्ताने काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी नागपुरात येऊन गेले व त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ नागपुरातूनच फोडला तो संविधानाचा मुद्दा उपस्थित करून. त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झाला. त्याची मोजमाप निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या यावरून करता येणार नाही, पण निकालाच्या त्सुनामीतही स्वत:ला टिकवून ठेवणारे आणि पराभूत होऊनही अंत्यत कमी मताने लढाई हरणाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यावर राहुल गांधींच्या संविधानाच्या मुद्याची व्याप्ती लक्षात येईल. राहुल गांधी यांनी चिमूरहून परत नागपूरला आल्यावर दिल्लीला जाण्यापूर्वी नागपुरातील दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील एका पोहेवाल्याच्या दुकानाला भेट दिली. फोडणीचे पोहे तयार केले. त्यांनी काय केले हे येथे महत्वाचे नाही. त्यांनी ज्या स्थळी हे केले ते ठिकाण महत्वाचे आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील ते ठिकाण आहे. आणि फडणवीस तेथून निवडणूक लढवत आहे व राहुल गांधींच्या सोबत फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवणारा उमेदवार आहे हे अधिक महत्वाचे आहे.या निवडणुकीत फडणवीस विजयी झाले. याचा दुसरा अर्थ राहुल गांधी यांच्या भेटीचा काँग्रेसला काहीच फायदा झाला नाही, असा आरोप होऊ शकतो. पण या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांना पडलेली मते लाखांनी आहे. ऐवढेच नव्हे तर त्यांनी २०१९ च्या तुलनेत फडणवीस यांचे मताधिक्य १० हजाराने कमी केले आहे. हा राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम आहे

हेही वाचा >>>मध्य नागपुरात हलबांच्या मतविभाजनाचा भाजपचा फायदा

प्रियकां गांधी यांचा दौरा

दुसरा मुद्दा प्रियंका गांधी यांच्या नागपूरमधील ‘रोड-शो’चा.विधानसभा निवडणूगक प्रचार दौऱ्या दरम्यान प्रियंका गांधी यांनी नागपुरात पश्चिम आणि मध्य नागपूर या दोन मतदारसंघात ‘रोड-शो’ केला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. पण पश्चिमची जागा काँग्रेसने पुन्हा जिंकली. पण मध्यची जागा गमावली. मध्य नागपूर विषयी बोलायचे ठरले तर याच मतदारसंघात संघाचे मुख्यालय आहे आणि प्रियंका गांधी यांचा रोड-शो तेथे गेला. तेव्हा भाजपच्या भाडोत्री कार्यकर्त्यांनी त्यात विघ्न आणण्याचे प्रयत्न केला. प्रियंका गांधी यांनी त्यांनाही अभिवादन केले. शुभेच्या दिल्या. त्यातून निर्माण झालेल्या सद्भभावनेचा काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेयांना फायदा झाला. पण भाजपने ही जागा जिंकली. तरीही विजयासाठी द्यावी लागलेली झुंज हीच प्रियंका गांधीच्या रोड-शो चे फलित ठरले.