Maha Vikas Aghadi in Raigad : रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षात असलेला समन्वयाचा आभाव उघड झाला आहे. त्यामुळे सात पैकी चार विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार समोरासमोर असणार आहे. महाविकास आघाडीतील हे मत विभाजन महायुतीच्या पथ्यावर पडू शकणार आहे.

जिल्ह्यात जागा वाटपापासून सुरू झालेला महाविकास आघाडीतील तिढा उमेदवारी अर्ज घेण्याची मुदत संपली तरी सुटू शकला नाही. शेकाप आणि शिवसेनेतील सुप्त संघर्ष यास कारणीभूत ठरला आहे. महा विकास आघाडीचे जागा वाटप होण्यापुर्वी शिवसेना ठाकरे गटाने आधी उरण, कर्जत आणि महाड मतदारसंघातून आपले उमेदवार जाहीर केले. नंतर शेतकरी कामगार पक्षाने अलिबाग, पेण, उरण आणि पनवेल या चार मतदारसंघातून परस्पर आपले उमेदवार जाहीर केले. श्रीवर्धन मधूनही राष्ट्रवादी शरद पवार गटाने शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांना परस्पर पक्षात घेत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पक्षातून अनिल नवगणेंची हकालपट्टी करण्याची वेळ ठाकरे गटावर आली. याच मतदारसंघातून काँग्रेसच्या राजेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाविरोधात अपक्ष म्हणून उमेदवार दाखल केला. त्यामुळे महा विकास आघाडीतील घटक पक्षांमधील समन्वयाचा आभाव प्रकर्षाने समोर आला.

Sandeep Bajoria
Yavatmal Vidhan Sabha Constituency: यवतमाळात महाविकास आघाडीत बंडाचे निशाण; माजी आमदार संदीप बाजोरीया यांनी भरला उमदेवारी अर्ज
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Sangli Vidhan Sabha Constituency Congress Vasantdada Patil Family Dispute for Maharashtra Assembly Election 2024
Sangli Vidhan Sabha Constituency: वसंतदादा पाटील घराण्यात उमेदवारीवरून फुटीचे ग्रहण ?
MVA Candidate seat sharing in Kolhapur stone pelting rebellion for Kolhapur Maharashtra Assembly Election 2024
कोल्हापुरात ‘मविआ’त उमेदवारीवरून गोंधळ; दगडफेक, बंडखोरी
Dispute continues in Chinchwad Bhosari in Mahavikas Aghadi Pune news
चिंचवड, भोसरीमध्ये महाविकास आघाडीत तिढा कायम
Maha Vikas Aghadi, Hitendra Thakur, bahujan vikas agahdi
हितेंद्र ठाकूर एकाकी, महाविकास आघाडीची दारे बंद
BJP candidate, Malkapur assembly constituency
भाजप उमेदवारीचा तिढा दिल्ली दरबारी! मलकापूरमधून संचेती व लखानी यांच्यात चुरस
Family First in Mahayuti and Maha Vikas Aghadi Candidates List
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा तिकिटवाटपात घराणेशाहीचा सर्वपक्षीय सुळसुळाट! दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकिट भावांनाही गोंजारलं!

हेही वाचा :Rebellion in Vidarbha: विदर्भातील १८ मतदार संघांत बंडखोरी! युती, आघाडीची कसोटी

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेना उध्दव ठाकरे गटाने अलिबाग, पेण आणि पनवेलची मधील आपले उमेदवार मागे घेण्याची घोषणा केली मात्र अलिबागचा अपवाद सोडला तर पेण आणि पनवेल मधून त्यांनी आपले उमेदवार कायम ठेवले. उरण मधून शेकापच्या प्रितम म्हात्रे यांनी आपला अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याने शिवसेना ठाकरे गटाने पेण आणि पनवेल मध्ये शेकाप विरोधात आपले उमेदवार कायम ठेवले असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे उरण, पनवेल, पेण, श्रीवर्धन या चार मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे उमेदवार निवडणुक रिंगणात असणार आहेत. यातील तीन मतदारसंघात शेकाप आणि शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार निवडणूक लढणार आहेत. घटक पक्षात असलेल्या समन्वयाचा आभाव आणि एकमेकांबद्दल असलेला अविश्वास यामुळे आघाडीत बिघाडी कायम राहिली आहे. चारही मतदारसंघात महाविकास आघाडीचे मतविभाजन महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :शिवसेना, धनुष्यबाण ही शिवसेनाप्रमुखांची मालमत्ता; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती

अलिबागची जागा ठाकरे गटाने सोडली….

पनवेल, पेण, उरण मधे शेकाप विरोधात शिवसेना ठाकरे गटाने आपले उमेदवार कायम ठेवले असले तरी, अलिबाग मधून शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार मागे घेतला आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मतदारसंघातून जयंत पाटील यांची सून चित्रलेखा पाटील निवडणूक लढवत आहे. सुरेंद्र म्हात्रे यांनी माघार घेतल्याने मतदारसंघात महा विकास आघाडीच्या मतांचे विभाजन टळू शकणार आहे.