राज्याच्या गुजरात लगतच्या सीमा भागात असणाऱ्या विधानसभा जागांसाठी सुरू असलेल्या प्रचारावर देखरेख ठेवण्यासाठी गुजरातमधून निरीक्षक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड व पालघर या विधानसभा क्षेत्रांमध्ये गुजरातमधील लोकप्रतिनिधी तसेच पक्षीय पदाधिकारी प्रचारावर देखरेख ठेवत असून गुजरातमधील अनेक वाहन पालघर जिल्ह्यात मुक्त संचार करीत आहेत.

राज्यातील विधानसभेच्या सुमारे २५ जागा या गुजरात राज्याच्या सीमेलगत असून त्या ठिकाणी सगे-सोयरी, नातेवाईक, संबंधितांमुळे गुजरात राज्याच्या सीमा भागाशी संबंधित आहेत. अशा ठिकाणी महायुतीच्या विशेषत: भाजपाच्या जागांवर प्रचारावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी गुजरातमधील लोकप्रतिनिधी व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी फौज दाखल झाली आहे.

FTII student short film, FTII student short film Oscar,
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Teacher Teach The Arm Span To Height Ratio In Class
VIRAL VIDEO : विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनोखा अंदाज, उंची मोजण्यासाठी दाखवला हा जबरदस्त हॅक, एकदा पाहाच
Decisions that protect the interests of consumers
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारे निकाल
Economic decline state government Sharad Pawar Vijay Wadettiwar criticize the government
आर्थिक घसरणीवरून राज्य सरकार लक्ष्य! शरद पवार, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
Discrepancy in teaching hours in RTE and State Syllabus
आरटीई, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील अध्यापन तासांमध्ये विसंगती… झाले काय, होणार काय?
Transfers of 28 police officers before assembly elections 2024
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८ अधिकाऱ्यांच्या बदल्या
ajit pawar and sharad pawar
तीन दिवस मुक्काम पोस्ट बारामती : औचित्य दिवाळी; उद्दिष्ट प्रचार!

हेही वाचा – अहेरीत अम्ब्रीशराव आत्रामांना भाजपचा छुपा पाठिंबा? बंडखोरीनंतरही पक्षाकडून कारवाई नाही

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, डहाणू व पालघर या मतदारसंघांमधील प्रचार व्यवस्थित सुरू असल्यावर पाहणी करण्यासाठी गुजरातमधील खासदार, आमदार, जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून कार्यरत असून त्यांच्या गाड्यांवर गुजरातमधील लोकप्रतिनिधी असण्याचे पाट्या झळकत आहेत.

गुजरातमधील प्रचार निरीक्षक व त्यांच्या प्रतिनिधींनी प्रथम मंडळनिहाय कार्यकर्त्यांची बैठक घेऊन एकंदर त्यांच्या देखरेखीखालील क्षेत्राचे भौगोलिक व राजकीय अवलोकन केले. त्यांच्याकडून प्रचाराचे नियोजन समन्वय तसेच देखरेख करून दररोज संकलित केलेली माहिती भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पाठवण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.

या मंडळींची निवासाची सोय वेगवेगळ्या हॉटेल व रिसॉर्टमध्ये करण्यात आली असून प्रचार संपल्यानंतर दररोज सायंकाळी व सकाळी या देखरेख समितीची आढावा बैठक घेतली जात आहे. भाजपा व मित्र पक्षांचे स्थानिक पदाधिकारी प्रचारात स्वतःला किती झोकून देतात, पक्षविरोधी कारवाई करण्यात कोणाचा सहभाग आहे का, मित्रपक्षांशी समन्वय आहे का, निवडणुकीसाठी आवश्यक प्रचार साहित्य व इतर सामग्री वेळेवर पोहोचली आहे का तसेच आपल्या उमेदवाराची सद्यस्थिती काय आहे याबाबतची तपशीलवार माहिती गोळा करून ती वरिष्ठांपर्यंत पाठविण्यात येत आहे.

हेही वाचा – Akola Assembly Election 2024 : अकोला जिल्ह्यात चुरशीच्या लढती, जातीय समीकरणे कळीचा मुद्दा; मतांचे गणित जुळवण्यासाठी उमेदवारांची धडपड

काही ठिकाणी गुजरातमधील या पाहुणे मंडळीनी सहभाग घेतला असून अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांना ग्रामपातळीवर भेटून त्यांच्या मार्फत उमेदवाराचा प्रचार अधिकाधिक कसा करता येईल याबाबत देखील प्रयत्न केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

विशेष म्हणजे स्थिर दक्षता पथक व भरारी दक्षता पथक जिल्ह्यात कार्यरत असून इतक्या मोठ्या प्रमाणात गुजरातच्या गाड्या पालघर जिल्ह्यात वावरत असताना त्याची तपासणी अथवा कारवाई केल्याबद्दल कुठेही माहिती प्राप्त झाली नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाला विचारले असता याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाली नसल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. मात्र अशा गाड्यांचा वावर असल्यास या गाड्यांवर देखरेख ठेवण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्तेला सांगितले.