यवतमाळ – यावेळी विधानसभा निवडणुकीत तीन-तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवित असल्याने जिल्ह्यात बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली. बंडखोरांच्या भूमिकेमुळे अधिकृत उमेदवारासमोर अडचणी निर्माण होत आहे. अखेर महाविकास आघाडी आणि महायुतीने बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करत घरचा रस्ता दाखविला आहे.

वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठाचे उमेदवार संजय देरकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या स्वपक्षासह काँग्रेसने बंडाचे निशाण फडकविले. काँग्रेसचे संजय खाडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांना शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, झरी तालुका प्रमुख चंद्रकांत घुगल, मारेगाव तालुका प्रमुख संजय आवारी आणि वणी येथील पक्षाचे कार्यकर्ते प्रसाद ठाकरे यांनी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना उघड उघड साथ दिली. त्यामुळे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून या चारही पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत कुठल्याही प्रकारची गटबाजी किंवा पक्षविरोधी कारवाई सहन केली जाणार नाही, असे पक्षप्रमुखांनी आधीच स्पष्ट केले होते. तरीही वणीत जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांनी पक्षाच्या उमदेवाराऐवजी अपक्षाला साथ दिल्याने चौघांनाही पक्षातून निलंबित केले, अशी माहिती शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिली.

sangli vidhan sabha 2024
बंडखोरीने सांगलीतील तीन लढती लक्षवेधी!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
maharashtra vidhan sabha election 2024 rebels certain in five constituencies of amravati district
Rebellion In Amravati District :अमरावती जिल्‍ह्यात पाच ठिकाणी बंडखोरी अटळ
maha vikas aghadi face rebels Challenges in yavatmal district
बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?
Maharashtra Assembly Election rebels from all party
सर्वपक्षीय बंडखोरांचा सुळसुळाट; भाजपाला सर्वाधिक फटका, मविआ-महायुतीची रणनीती काय?
Maharashtra assembly election
बंडखोर लढण्यावर ठाम, नेत्यांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न; जागावाटपाच्या घोळामुळे बंडाळी अटळ
There was no attack on BJP rebel candidate Vishal Parab car
भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला नाही,तो वाट चुकलेला परप्रांतीय कामगार
maharashtra vidhan sabha election 2024 mva mahayuti involved in discussion with rebels for damage control in amravati assembly elections
बंडखोरांना थोपविण्यासाठी चर्चा, भेटींचे सत्र; वणी, उमरखेड, यवतमाळमध्ये बंडखोर माघार घेण्याची शक्यता नाही

हेही वाचा – डोंबिवलीत रवींद्र चव्हाण, राजू पाटील एकीने शिंदे यांच्या गोटात चुळबूळ

उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपने बंडखोरांवर कारवाई केली. भाजपचे पदाधिकारी असूनही पक्षशिस्त व अनुशासन भंग केल्याप्रकरणी भाविक भगत आणि नटवरलाल उंतवल यांना पक्षातून निष्काशित करण्यात आले. पक्षाचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहीने या पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. भाविक भगत निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. उमरखेडमध्ये महाविकास आघाडीतही बंडखोरी झाली. काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांनीच बंडखोरी केल्याने येथे पक्षाची अडचण झाली आहे. पक्षशिस्त भंग केल्यामुळे नियमाप्रमाणे विजय खडसे यांच्यावरही कारवाईचे संकेत काँग्रेस नेत्यांनी दिले आहे. मात्र पक्षाने खडसे यांच्यावर अद्याप कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा – बंडखोरीवरून वरपूडकर- बाबाजानी यांच्यात कलगीतुरा

जिल्ह्यात वणी व उमरखेड वगळता इतर सातही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार आहे. वणी आणि उमरखेडमध्ये बंडखोरांच्या उमेदवारीने चौरंगी लढत होणार असल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. वणीत काँग्रेस आणि शिवसेना उबाठा उघडपणे अपक्षाला मदत करत असल्याने येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर अडचणी वाढल्या आहेत. महाविकास आघाडी आणि अपक्षामध्ये कुणबी मते विभाजीत होवून त्याचा फायदा भाजपला होईल, असे गृहीत धरले जात होते. मात्र भाजपच्या कार्यकर्त्याने कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भाजपविरोधात वातावरण तापले आहे. त्यामुळे येथील लढत निर्णायक वळणावर आली आहे.