सांगली : निवडणुकीतील नव्या ‘ठेकेदारी’ पद्धतीच्या प्रचाराचा शेतीकामांना फटका बसत आहे. शेतीची कामे तुंबली असताना कोणाला कामाला येता का असे विचारले, तर ‘न्हाय बा!’ असेच उत्तर सध्या मिळत आहे. प्रचाराला गेल्यावर चारशे रुपये आणि जेवणाचे पाकीट मिळत असताना ३०० रुपये हजेरीने शेतात राबण्यासाठी कोण येईल, असे ऐकविले जाते. त्यामुळे मजूर मिळणे दुरापास्त झाल्याने शेतीची अनेक कामे खोळंबली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पावसाने विश्रांती दिल्यानंतर द्राक्षबागेत फळछाटणी झालेल्या ठिकाणी अनेक कामे खोळंबली आहेत. घड नसलेले नवे फुटवे काढणे (वांझ पुसणी), घडाला पुरेसा अन्नपुरवठा व्हावा यासाठी नवीन फुटव्याची वाढ रोखणे (खुडा-बाळी) ही कामे वेळेत झाली, तरच उत्पन्न चांगले आणि खात्रीलायक मिळण्याची आशा असते. शाळू पेरणी झालेल्या रानात भांगलणीची कामे आली आहेत. गहू टोकणीचा हंगाम आहे. गव्हासाठी औतकाम झाले असले, तरी ओपी तयार करून टोकणीसाठी महिला मजूरच उपलब्ध नाहीत. दसऱ्यापूर्वी पेरणी झालेल्या गव्हाची भांगलण, हरभऱ्याची शेेेडे खुडणी केली, तरच फुटवे फुटणार आहेत. भाजीपाला, तरकारीची मशागत, तोडणी, मालभरणीसाठी हात हवेत. ही कामे वेळेत करण्यासाठी मजुरांची गरज आहे. दहा-पंधरा दिवसांपासून या कामासाठी रोजंदारी करणारे मजूरच मिळेनासे झाले आहेत.
हेही वाचा >>> श्रीलंकेच्या संसदेत एनपीपीला बहुमत ; २२५ पैकी १५९ जागांवर विजय
शेतात काम करण्यासाठी सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत महिलांना २५०, तर पुरुषांना ३०० रुपये मिळतात. आतापर्यंत अनेक मजूर शेतात कामासाठी सहज उपलब्ध होत होते. मात्र, निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचाराला गर्दी जमविण्याची गरज निर्माण झाली. अशा वेळी सहज उपलब्ध असलेल्या मजुरांनाच मोठी मागणी आली आहे. शेतात काम करून त्रस्त झालेले मजूरही यामुळे खुशीत आहेत. थंडी-उन्हात शेतातील कष्टाचे काम करण्यापेक्षा गाडीत बसून केवळ घोषणा देण्याचे काम सोपे आणि जास्त कमाई देणारे. एकीकडे दिवसभर राबल्यावर तीनशे रुपये मिळत होते, तर आता केवळ सभा, प्रचारफेरीत जायचे आणि चारशे रुपये रोज, चहा-जेवणाचीही सोय साधून घ्यायची. ठरलेल्या उमेदवाराच्या मागे जायचे आणि सांगितलेली घोषणा द्यायची. अनेक जण एकाचा प्रचार संपवून दुसऱ्याच्या प्रचारालाही हजेरी लावत दुप्पट पैसे मिळवीत आहेत. रोजचे गोडाचे जेवण आणि रोखीने हिशेब यामुळे ग्रामीण भागात हा रोजगार सध्या जोमात आहे. बहुतेक शेतमजूर सध्या प्रचाराकडे वळले असल्यामुळे शेतीची अन्य कामे ठप्प झाली आहेत.
द्राक्षबागेतील कामाबरोबरच गव्हाची टोकणी, भांगलण या कामाचा घायटा (कामांची एकाच वेळी घाई) उठला असताना मजूर मिळत नाहीत. त्यामुळे यंदा परिस्थिती अनुकूल असतानाही उत्पन्नात घट होण्याचा धोका आहे. – रवींद्र पाटील, शेतकरी (बोलवाड, सांगली)
निवडणुकीत प्रचाराला गेले, तर चारशे रुपये रोज आणि जेवणाचे पाकीट मिळत आहे. या बदल्यात फक्त वेळच द्यावा लागत असून, शारीरिक कष्ट काहीच नाहीत. आमच्यासाठी चार दिवस सुगीचे आले आहेत, तर कामाला कशाला जावं? – सुनंदा जाधव, शेतमजूर (वड्डी, सांगली)