औरंगाबाद पूर्व
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस पक्षाने अचानक बदललेली उमेदवारी, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते अतुल सावे यांना दिलेली साथ यामुळे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील चुरस आता फक्त ‘एमआयएम’बरोबर असेल हे स्पष्ट झाले आहे. ‘एमआयएम’ने अकबरूद्दिन ओवेसी आणि असदुद्दिन ओवेसी यांना मैदानात उतरवल्याने औरंगाबाद पूर्वचा लढा पुन्हा पारंपरिक ‘हिंदू-मुस्लीम’ विभाजनावरून चर्चेत आला आहे. त्यातच भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ घोषणेला एमआयएमनेही ‘इत्तेहाद’ने उत्तर देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात ‘एमआयएम’च्या नेत्यांवर आरोपाची राळ उडवत डॉ. गफ्फार कादरी आणि इम्तियाज जलील यांचे कट्टर विरोधक अशी प्रतिमा असणारे अफसर खान हे अपक्ष मैदानात आहेत. या मतदारसंघात ११० उमेदवारांनी अर्ज भरले होते. यातील बहुतांश मुस्लीम उमेदवार अतुल सावे यांनी उभे केले आहेत, असा अरोप ‘एमआयएम’चे उमेदवार जलील यांनी केला होता.
हेही वाचा >>> काँग्रेसशासित राज्यांमध्ये केवळ फसवणूक; कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील भाजपा नेत्यांची टीका
शहरातील पाणीपुरवठा योजनेमध्ये अतुल सावे हेच अग्रेसर नेते होते, अशीही मांडणी भाजपकडून केली जात आहे. त्यामुळेच ‘सबको भावे-अतुल सावे’ अशी घोषणाही दिली जात आहे. दुसऱ्या बाजूला ‘एमआयएम’कडून भाजपच धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा प्रचार सुरू आहे. मुस्लीम मतदारांना एकगठ्ठा ठेवण्यासाठी ओवेसी बंधू प्रचार फेऱ्यांमध्येही सहभागी होत आहेत. शिवाय सभांमध्येही ‘इत्तेहाद’ आवश्यक असल्याचे आवर्जून सांगत आहेत. त्यामुळे औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ‘व्होट जिहाद’ विरुद्ध ‘मतांचे धर्मयुद्ध’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी दिली. ‘एमआयएम’चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान दिसणाऱ्या भगव्या टोप्या आता प्रचारातून गायब झाल्या आहेत. भाषा जरी सध्या सर्वसमावेशक असली तरी अकबरूद्दिन ओवेसी शेवटच्या सभेत ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ची फटकेबाजी करणार असल्याचे जलील यांनीच जाहीर सभेत सांगितले आहे.
निर्णायक मुद्दे
● औरंगाबाद पूर्व मतदारसंघात दलित आणि मराठा मतांचा कौल अतुल सावे यांच्या बाजूने राहतो की ‘एमआयएम’च्या, यावर निकाल अवलंबून असल्यानेच इम्तियाज जलील यांनी आंतरवली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.
● ओवेसी बंधू आणि इम्तियाज जलील सारे जण जरांगे यांचे कौतुक करत असतात. त्यामुळे औरंगाबाद शहर मतदारसंघातील प्रचार खऱ्या अर्थाने ‘भगवा’ व ‘हिरवा’ अशा दोन रंगांचा असल्याचे दिसून येत आहे.
● या मतदारसंघातील काँग्रेसचा प्रभाव पुन्हा असून नसल्यासारखा असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकगठ्ठा मतांच्या खेळात दलित मते आणि जरांगे समर्थकांची मते कोणाला मिळतील, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.