दादर-माहीम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे दादर-माहीम विधानसभा मतदारसंघ विशेष चर्चेत आला. त्यात शिवसेनेचे (शिंदे) आमदार सदा सरवणकर यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने, शिवाय शिवसेना ठाकरे गटातर्फे महेश सावंत यांच्या उमेदवारीने येथे तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांची स्थापना झाली त्या भागातील ही लढाई खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यातच होत आहे.
दादर, प्रभादेवी, शिवाजी पार्क आणि माहीमचा भाग हा परिसर माहीम विधानसभा मतदारसंघात येतो. शिवसेनेची स्थापना, दसरा मेळावा, शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ यामुळे हा शिवसेनेसाठी जिव्हाळ्याचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात ठाकरे कुटुंबातील अमित ठाकरे हे निवडणुकीला सामोरे जात असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सदा सरवणकर यांचे या मतदारसंघात प्राबल्य असून २००४, २०१४ आणि २०१९ तीन वेळा ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ते सध्या शिंदे गटाचे आमदार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेतून नगरसेवकपदाचे तिकीट न मिळाल्याने मागील महापालिका निवडणुकीत महेश सावंत यांनी बंडखोरी केली होती. सरवणकर यांचे पुत्र समाधान यांच्याविरोधात त्यांनी कडवी झुंज दिली. यावेळी अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता. सरवणकर शिंदे गटात गेल्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. या मतदारसंघात सावंत यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
हेही वाचा >>> Latur Politics : अमित देशमुखांना भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान; देशमुख वर्चस्व राखणार की चाकूरकर जायंट किलर ठरणार?
राज ठाकरे यांच्या पुत्राला पाठिंबा द्यावा, असा भाजपमध्ये मतप्रवाह होता. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काळात राज यांनी मुख्यमंत्रीपदावरून शिंदे यांना डिवचले. फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असे भाकीत व्यक्त केले. त्यातून शिंदे यांनी राज ठाकरे यांना मदत करण्यास नकार दिल्याची चर्चा आहे.
निर्णायक मुद्दे
●मनसे, शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) अशी एकाच पक्षातून तयार झालेल्या तीन सेना या मतदारसंघात आहेत. त्यामुळे मराठीबहुल मतदारसंघात थेट मतविभागणी होणार आहे.
●उत्तर भारतीय तसेच गुजराती समाजही या भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाला आहे. त्याचप्रमाणे मराठी मतदार, कोळी मतदार आणि मुस्लीम मतदार निर्णायक ठरणार आहेत.
●माहीम परिसरात काँग्रेसचेही प्राबल्य आहे. काँग्रेसची १७ हजार मते मतदारसंघात असून ही मते उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या पाठीशी राहिल्यास मतदानाचा निकाल आश्चर्यचकित ठरणाराही असू शकतो.
लोकसभेतील राजकीय चित्र
●महायुती- ६९,४८८
●महाविकास आघाडी- ५५,४९८