मुंबई : राज्यात महायुतीच्या दणदणीत विजयाप्रमाणेच मुंबईवरही भाजप व महायुतीनेच झेंडा रोवला आहे. मुंबईवर आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र ते मोडीत काढून महायुतीला २२ तर भाजपला १५ जागांवर विजय मिळाल्याने भाजपने आता मुंबईही काबीज केली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशावर मात करून महायुतीने यश प्राप्त केले.

लोकसभा निवडणुकीत मुंबईत महायुतीला मोठे यश मिळाले होते. महायुतीचे उमेदवार पियूष गोयल हे उत्तर मुंबईतून तर शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवार रवींद्र वायकर हे वायव्य मुंबईतून विजयी झाले होते, तर महाविकास आघाडीने सहापैकी चार जागा पटकावल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील अपयश महायुतीने धुऊन काढले. भाजपचे उमेदवार १५ तर शिवसेनेचे सहा जागांवर विजयी झाले आहेत. मलबार हिल मतदारसंघातून भाजपचे मंगलप्रभात लोढा हे तब्बल सातव्यांदा सलगपणे निवडून आले असून त्यांनी ७२ टक्क्यांहून अधिक मते मिळविली, तर कालिदास कोळंबकर हे नायगावमधून नवव्यांदा विजयी झाले. मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार हे वांद्रे (प.) मतदारसंघातून १९,९३१ मतांनी विजयी झाले असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कांदिवलीतून अतुल भातखळकर, चारकोपमधून योगेश सागर, विलेपार्लेतून पराग अळवणी, गोरेगावमधून विद्या ठाकूर आदी भाजप आमदार पुन्हा निवडून आले. काँग्रेसला मुंबईत तीन जागांवरच समाधान मानावे लागले. त्यात मालाड (प.) मतदारसंघातून अस्लम शेख, धारावीतून ज्योती गायकवाड आणि मुंबादेवीतून अमीन पटेल यांचा समावेश आहे.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

हेही वाचा :मराठवाडा : ४६ पैकी ४० जागांवर महायुतीचा भगवा, महायुतीचे ‘रक्षाबंधन’! भाजपची विजयाची कमान चढती

शिवसेनेला (उद्धव ठाकरे) १० जागांवर विजय मिळाला असून माहीम, शिवडी व वरळीमध्ये अटीतटीची लढत झाली. वरळीत आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी महायुतीने चंग बांधला होता. पण ठाकरे गटाने नेटाने किल्ला लढवत ही जागा राखली.

अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर

माहीम मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे रिंगणात होते. त्यांना भाजपने सुरुवातीला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र शिवसेना उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही आणि ही निवडणूक अटीतटीची झाली. त्यात ठाकरे गटाचे महेश सावंत यांचा १,३१६ मताधिक्याने विजय झाला. अमित ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

नवाब मलिक पराभूत, पण कन्या विजयी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला मुंबईत एकाच मतदारसंघात विजय मिळाला असून अणुशक्तीनगरमधून माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना ३,३७८ मतांनी विजय मिळाला. अजित पवार गटाला मुंबईत एकाच जागेवर विजय मिळाला. शिवाजीनगर-मानखुर्दमधून निवडणूक लढविलेल्या नवाब मलिक यांना केवळ १५,५०१ मते मिळाली आणि ३९,२७९ मतांनी त्यांचा पराभव झाला. कुख्यात दाऊद इब्राहिमशी आर्थिक हितसंबंधांचा आरोप असलेले मलिक हे सध्या वैद्याकीय जामीनावर असताना त्यांनी ही निवडणूक लढविली होती. या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी हे विजयी झाले.

हेही वाचा :उत्तर महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रात ३५ पैकी ३३ जागांवर महायुती

●गेल्या निवडणुकीत ५०० हून कमी मतांनी विजयी झालेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदार दिलीप लांडे यांनी यंदा मात्र चांदिवली मतदारसंघातून २०,६२५ मताधिक्य घेत मोठा विजय मिळविला.

●मागाठाणेतून प्रकाश सुर्वे यांना ५८ हजाराचे मोठे मताधिक्य मिळाले, तर कुर्ल्यातून मंगेश कुडाळकर निवडून आले.

●दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविलेल्या यामिनी जाधव यांचा पराभव झाल्याने त्यांनी भायखळा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र त्यांचा पुन्हा ३१,३६१ मतांनी पराभव झाला.

●काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केलेल्या आमदार झिशान सिद्धीकी यांना ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई यांनी वांद्रे (पूर्व) मतदारसंघातून ११,३६५ मतांनी पराभूत केले.

हेही वाचा : विदर्भ : विदर्भात महायुतीची लाट, विरोधक भुईसपाट

प्रमुख विजयी उमेदवार

●राहुल नार्वेकर (कुलाबा – भाजप)

●आदित्य ठाकरे (वरळी – शिवसेना ठाकरे गट)

●कालिदास कोळंबकर ( वडाळा – भाजप)

●प्रकाश सुर्वे (मागाठाणे – शिवसेना शिंदे गट)

●मंगलप्रभात लोढा (मलबार हिल – भाजप)

●अजय चौधरी (शिवडी – शिवसेना ठाकरे गट)

●अबु आझमी (मानखुर्द – सपा)

प्रमुख पराभूत उमेदवार

●नवाब मलिक (मानखुर्द – राष्ट्रवादी अ.प.)

●यामिनी जाधव (भायखळा – शिवसेना शिंदे गट)

●बाळा नांदगावकर (शिवडी – मनसे)

●अमित ठाकरे (माहिम – मनसे)

●मिलिंद देवरा (वरळी – शिवसेना शिंदे गट)

Story img Loader