Maharashtra Assembly Election 2024: केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी १५ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आणि राजकीय वर्तुराचा रागरंगच बदलून गेला. जागावाटप आणि उमेदवारीवाटप या दोन्ही प्रक्रियांनी वेग घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २८८ मतदारसंघात मतदान होणार असून प्रत्येक मतदारसंघातील पक्षीय बलाबलानुसार जागावाटप व उमेदवार निश्चितीची गणितं लावली जात आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्या अशा ३१ जागा आहेत, जिथे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही आघाड्या काठावर आहेत. त्यामुळे या ३१ जागा यंदाच्या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमकं गणित?

कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे त्या त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या संख्येवरून ठरतं. मात्र, त्याचबरोबर त्या लोकप्रतिनिधींना मिळालेल्या मतांच्या आधारावरही ठरवलं जातं. त्यासाठी याआधीच्या निवडणुकांमध्ये संबंधित पक्षांना मिळालेल्या मतांची आकडेवारी आधारभूत मानली जाते. त्याचाच विचार करता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ३१ मतदारसंघ असे आहेत, जिथे विजयी व पराभूत उमेदवारांमध्ये मतांचं अंतर पाच हजारांहून कमी होतं! त्यातही या ३१ मतदारसंघांची विभागणी सत्ताधारी व विरोधकांमध्ये जवळपास समसमान अर्थात १६ आणि १५ अशी आहे. त्यामुळे या ३१ मतदारसंघांवर सगळ्यांचं लक्ष असेल.

Arvind Kejriwal
Delhi : महाराष्ट्रात भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ‘या’ केंद्रशासित प्रदेशात राबवणार लाडकी बहीण योजना; नावनोंदणीही सुरू!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
29 villages Vasai Virar, Vasai Virar Municipal Corporation, Vasai Virar,
२९ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश, ३१ हजार हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल

लोकसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?

यंदाच्या लोकसभा निवडणुकी महाविकास आघाडीनं ३१ जागांवर विजय मिळवला असून सत्ताधारी महायुतीकडे अवघ्या १७ जागा गेल्या. त्यामुळे राज्यात मतदारांचा कौल विरोधकांच्या बाजूने असल्याचं गणित राजकीय विश्लेषक मांडू लागले आहेत. आकडेवारीचा विचार करता महाविकास आघाडीकडे असणाऱ्या ३१ लोकसभा मतदारसंघांनुसार एकूण १५८ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचं प्राबल्य आहे. तसं झाल्यास १४५ हा सत्तास्थापनेचा जादुई आकडा महाविकास आघाडी सहज गाठेल. तर दुसरीकडे महायुतीकडे असणाऱ्या १७ जागांनुसार त्यांच्याकडे १२५ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्राबल्य आहे.

दोन्ही आघाड्यांमधलं अंतर ३३ विधानसभा मतदारसंघांचं आहे. त्यातल्या ३१ मतदारसंघांमध्ये अवघ्या पाच हजार मतांनी विजय किंवा पराभव घडून आले आहेत. त्यात मुंबईतील अंधेरी पश्चिम व मालाड पश्चिम ते पालघरमधील डहाणू आणि बीडमधील माजलगाव अशा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे या काठावरच्या मतदारसंघांमध्ये निकाल कोणत्याही बाजूने लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे ३१ मतदारसंघही दोन्ही बाजूंना जवळपास समसमान आहेत. त्यातील १६ मतदारसंघांमध्ये मविआ तर १५ मतदारसंघांमध्ये महायुती आघाडीवर आहे. अर्थात, १६ मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय झाला असला, तरी मविआचे उमेदवार पाच हजारांहून कमी मतांनी पिछाडीवर होते. तर दुसरीकडे १५ मतदारसंघांमध्ये मविआचा विजय झाला असला, तरी महायुतीचे उमेदवार पाच हजारहून कमी मतांनी पिछाडीवर होते.

महायुती आघाडीवर असणारे काही मतदारसंघ…

नेवासा, मावळ, महाड, कराड दक्षिण, शिरोळ, सांगोला, अहमदपूर, उदगीर, मालेगाव, भोकर, पुसद, धुळे शहर, पुणे कँटोनमेंट

मविआ आघाडीवर असणारे काही मतदारसंघ…

डहाणू, पाटण, मुखेड, देगलूर, नायगाव, हदगाव, रामटेक, भोकरदन, कराड उत्तर

तसं पाहिलं तर लोकसभा निवडणुकीतील मतदान व विधानसभा निवडणुकीतील मतदान यामध्ये बराच फरक असू शकतो. पण या मतदानातून राज्याच्या राजकीय मतविभागणीचा साधारण अंदाज येणं शक्य आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या राज्यातल्या दोन प्रमुख पक्षांमध्ये अनुक्रमे २०२२ व २०२३ या वर्षी पडलेल्या फुटीमुळे राज्यातल्या सत्तासमीकरणांमध्ये मोठे उलटफेर झाले. बदललेल्या परिस्थितीत मविआमध्ये काँग्रेससह शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) हे दोन पक्ष आले. तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपासह शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) हे दोन पक्ष आले.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date_ Maharashtra Assembly Election 2024
महाराष्ट्र विधानसभेतील काठावरचे मतदारसंघ! (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

३१ मतदारसंघांची पक्षनिहाय आकडेवारी काय सांगते?

काठावरच्या ३१ मतदारसंघांचं पक्षनिहाय गणित पाहिल्यास भाजपा ९ ठिकाणी आघाडीवर तर ११ ठिकाणी पिछाडीवर आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) ५ ठिकाणी आघाडीवर तर ५ ठिकाणी पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) एका ठिकाणी आघाडीवर आहे. दुसरीकडे मविआमध्ये काँग्रेस ८ ठिकाणी आघाडीवर असून ६ ठिकाणी पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) २ ठिकाणी आघाडीवर तर २ ठिकाणी पिछाडीवर आहे. तर शिवसेना (उद्धव ठाकरे) ६ ठिकाणी आघाडीवर तर ६ ठिकाणी पिछाडीवर आहे.

Marathwada Politics: विधानसभा निवडणूक : मराठवाड्यात काय चालणार विकास की जातीय मुद्दे?

लोकसभा निवडणुकीतील विभागनिहाय मतविभागणी

दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालांनुसार महायुती १२५ जागांवर तर मविआ १५८ जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. त्यानुसार…

विभागभाजपाशिवसेना (एकनाथ शिंदे)राष्ट्रवादी (अजित पवार)काँग्रेसशिवसेना (उद्धव ठाकरे)राष्ट्रवादी (शरद पवार)इतरएमआयएम
पश्चिम महाराष्ट्र (७०)१७१११५१९
विदर्भ (६२)१५२९
मराठवाडा (४६)१४१५
ठाणे-कोकण (३९)१११२
उत्तर महाराष्ट्र (३५)२०
मुंबई (३६)१५
एकूण (२८८)७९४०६८३३५७

अवघ्या महिन्याभरात निवडणुका पार पडणार असून त्याअनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आकडेवारीचा अभ्यास करूनच हे पक्ष जागावाटपाच्या व उमेदवार निश्चितीच्या चर्चा करत असून त्यानुसार येत्या काही दिवसांत नेमकं राजकीय चित्र स्पष्ट होऊ शकेल.

Story img Loader